किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम
वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे भारतीय टीमची बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात ताकद वाढणार आहे. फिरकीला पोषक असलेल्या दिल्लीच्या मैदानावर त्याची भूमिका महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे, विकेटकीपर बॅटर ईशान किशनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. कालच्या सरावावेळी जसप्रीत बुमराहचा एक वेगवान यॉर्कर बॉल ईशानच्या डाव्या पायावर लागला होता. त्यामुळे तो आजच्या मॅचमध्ये खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय टॉस वेळीच घेतला जाईल. ईशानच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला आजच्या मॅचमध्ये संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
advertisement
बुमराह तापातून पूर्णपणे सावरला
वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह तापातून पूर्णपणे सावरला असून तो आजच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. बुमराह परतल्यामुळे गेल्या मॅचमध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला मात्र बाहेर बसावे लागणार आहे. सिराजने चांगली कामगिरी केली असली तरी, बुमराहसारख्या अनुभवी बॉलरला संघात स्थान देण्यासाठी त्याला वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
डिस्चार्ज मिळाला असला तरी...
दरम्यान, सलामीवीर अभिषेक शर्माला पोटाच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी तो आजही पूर्णपणे फिट नसल्यामुळे आजची मॅच खेळणार नाही. त्यामुळे ओपनिंगमध्ये ईशान किंवा संजू यांच्यापैकी कोणीतरी एकाला संधी दिली जाईल. आजच्या मॅचमध्ये संजू सॅमसनचे पुनरागमन पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल. अभिषेक आणि ईशान यांच्या फिटनेस समस्यांमुळे सॅमसनकडे आपली जागा पक्की करण्याची ही सुवर्णसंधी असेल.
टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
