IND W vs AUS W : भारताच्या महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच संघाने ऑस्ट्रेलियाचा इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला नव्हता. त्यामुळे भारतीय महिला संघासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. तर या पराभवाने ऑस्ट्रेलियाची चांगलीच लाज गेली आहे. तसेच या विजयासह भारताने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
advertisement
खरं प्रथम फलंदाजी करताना भारताचा महिला संघ 292 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 190 धावांवर ऑल आऊट झाली होती. इतक्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना पहिल्यांच्या ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा अपयशी ठरली. विशेष म्हणजे लक्ष्याचा पाठलान करताना ऑस्ट्रेलिया किमान तगडी फाईट तरी देत होते. पण या सामन्यात अवघ्या 102 धावांनी त्यांचा पराभव झाला. हा आतापर्यंत वनडे इतिहासातील सर्वाधिक धावांनी ऑस्ट्रेलियाचा झालेला पराभव आहे.आणि टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय आहे.
ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावांनी झालेला पराभव
102 धावा विरुद्ध भारत-पश्चिम, मुल्लानपूर, 2025
92 धावा विरुद्ध इंग्लंड-पश्चिम, एजबॅस्टन, 1973
88 धावा विरुद्ध भारत-पश्चिम, चेन्नई (एमएसव्ही), 2004
84 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका-पश्चिम, उत्तर सिडनी, 2024
82 धावा विरुद्ध न्यूझीलंड-पश्चिम, लिंकन, 2008
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मंधानाने या सामन्यात 117 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 14 चौकार लगावले होते. स्मृतीसोबत दिप्ती शर्माने 40 धावांची खेळी केली होती. या खेळाडूंच्या बळावर भारतीय संघाने 292 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने 3, अॅश्ली गार्डनरने 2 तर मेगन,एनाबेल आणि ताहिलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलान करताना ऑस्ट्रेलियाची खराब सूरूवात झाली होती. कारण ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलीसा हिली आणि जॉर्जिया वॉल स्वस्तात बाद झाली होती. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एलीस पेरीने 44 तर एनाबेलने 45 धावांची खेळी केली होती.या दोन खेळाडूं व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 190 धावांवर ऑल आऊट झाला.त्यामुळे टीम इंडियाने 102 धावांनी हा सामना जिंकला होता.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती.आता तिसरा वनडे सामना जिंकून कोण मालिका खिशात घालतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.