टीम इंडियाला लाला म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा खेळाडू आहे तरी कोण, तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आहे.अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याला साजेशी अशी कामगिरी करू शकला नव्हता, त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती.पण मोक्याच्या क्षणी संजू सॅमसनची बॅट तळपल्यामुळे टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.
advertisement
दरम्यान आता वर्ल्ड कप समाप्तीनंतर अभिषेक शर्मा हा आपल्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. या दरम्यान त्याने मैदानात कसून सराव केला होता. या सरावानंतर आता सनरायझर्स हैदराबादने एक प्रॅक्टीस मॅच खेळवला होता. या सामन्यात अभिषेक शर्माने 42 बॉलमध्ये 94 धावांची वादळी खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहता तो फॉर्ममध्ये परतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला दिलासा मिळाला आहे.
टी20 वर्ल्डकपमध्ये हाच अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म होता. ग्रुप स्टेज आणि सुरुवातीच्या नॉकआऊटमध्ये त्यांनी अनेकदा डक केले होते. फाइनलपर्यंत (7 इनिंग्जमध्ये) त्यांनी फक्त 89 रन केले होते. पण फाइनल मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने जबरदस्त कमबॅक केले. त्याने 21 चेंडूत 52 रन केले होते. या दरम्यान 6 चौकार, 3 षटकार लगावले होते. विशेष म्हणजे त्याने अर्धशतक फक्त 18 चेंडूत पूर्ण केले होते. हे टी20 वर्ल्ड कपमधले फायनलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले होते.
