TRENDING:

IPL 2026 : संजू सॅमसन आला पण CSK ला 440 वोल्टचा झटका! 31 वर्षांचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Last Updated:

CSK Nathan ellis set to ruled out IPL 2026 : टीमचा स्टार वेगवान बॉलर नेथन एलिस संपूर्ण सीजनमधून बाहेर झाल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या वक्तव्याला या वृत्ताला दुजोरा मिळालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026, Chennai Super Kings : यंदाच्या आयपीएल 2026 मध्ये चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. येत्या 30 मार्च रोजी हा सामना खेळवला जाईल, त्यासाठी आता थाला धोनीसह चेता संजू सॅमसन देखील तयारीला लागला आहे. दोन्ही स्टार प्लेयर सराव करत असून यांच्यावर सर्वांचं लक्ष असेल. आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सला जोर का झटका बसला आहे.
IPL 2026 csk major setback As nathan ellis set to ruled out
IPL 2026 csk major setback As nathan ellis set to ruled out
advertisement

आमच्यासाठी हा मोठा धक्का - सीएसके सीईओ

टीमचा स्टार वेगवान बॉलर नेथन एलिस संपूर्ण आयपीएल सीजनमधून बाहेर झाल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या वक्तव्याला या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, ऋतुराज गायकवाडच्या अडचणी वाढल्या आहेत. "आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. एलिस हा एक अत्यंत महत्त्वाचा बॉलर आहे, विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्याची उणीव भासेल. आम्ही आता त्याच्या रिप्लेसमेंटचा शोध घेत आहोत", असं सीएसकेच्या सीईओ यांनी म्हटलं आहे.

advertisement

दोन परदेशी पर्याय उपलब्ध

चेन्नईकडे सध्या मॅट हेन्री आणि जेमी ओव्हरटन यांसारखे परदेशी पर्याय उपलब्ध आहेत, तरीही एलिसची जागा भरून काढणं आव्हानात्मक असेल. लिलावात टीमने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याची विकेट घेण्याची क्षमता पाहता, कॅप्टन ऋतुराज गायकवाडला आता बॉलिंग कॉम्बिनेशनमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. मागील हंगामात चेन्नईकडे पथिराणा होता. मात्र, आता त्याला रिलीज तेल्यानंतर मॅट हेन्री आणि जेमी ओव्हरटन यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

advertisement

चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण स्कॉड -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नाथन एलिस (बाहेर), श्रेयस गोपाल, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, जेमी ओवर्टन, गुरजापनीत सिंह, अंशुल कंबोज, अकील होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेनरी, राहुल चाहर आणि जैक फॉल्क्स.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : संजू सॅमसन आला पण CSK ला 440 वोल्टचा झटका! 31 वर्षांचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल