गावसकरांनाही चुकीचं ठरवलं
कूपर कॉनलीच्या या मॅच विनिंग खेळीमुळे पंजाबला अडचणीतून बाहेर काढलं आणि विजय मिळाला. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 21 रनची गरज होती, तेव्हा गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने आयपीएल पदार्पण करणाऱ्या अशोक शर्माच्या हातात बॉल दिला. अनुभव नसलेल्या अशोक शर्माला बॉल देऊन गिल मोठी चूक करत आहे, असं कॉमेंट्री करत असलेले गावसकरही म्हणाले, पण अशोक शर्माने त्याच्या या ओव्हरमध्ये गावसकरांनाही चुकीचं ठरवलं.
advertisement
अशोक शर्माने मॅचच्या 18व्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन देऊन एक विकेटही घेतली. ओव्हरच्या चौथ्या बॉलला अशोक शर्माने मार्को यानसनला आऊट केलं. अशोक शर्माची आयपीएलमधली ही पहिली विकेट ठरली. अशोक शर्माने या ओव्हरचा चौथा बॉल 149 किमी प्रती तासाच्या वेगाने टाकला. अशोक शर्माने या सामन्यात 3 ओव्हर बॉलिंग केली ज्यात त्याने 31 रन देऊन 3 विकेट घेतल्या. आपल्या पहिल्याच सामन्यात अशोकने दाखवलेल्या टॅलेंटचं कौतुक होत आहे.
अशोकने 17 व्या ओव्हरमध्ये दिलेल्या 5 रनमुळे गुजरातसमोर विजयाच्या आशा निर्माण झाल्या कारण पुढच्या 2 ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 16 रनची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त 3 विकेट शिल्लक होत्या.
अशोक शर्माने टाकलेल्या या उत्कृष्ट ओव्हरनंतर मात्र प्रसिद्ध कृष्णाने गुजरातच्या हातातून सामना घालवला. 19व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला झेवियर बार्टलेटने कृष्णाला सिक्स मारली, त्यानंतर बार्टलेटने एक रन काढून कूपर कॉनलीला स्ट्राईक दिली. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कॉनलीने फोर मारून पंजाबला विजयाच्या आणखी जवळ आणलं. प्रसिद्ध कृष्णाने 19व्या ओव्हरमध्ये 14 रन दिल्यामुळे पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी फक्त 2 रनची गरज होती, हे आव्हान पंजाबने 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फोर मारून पार पाडलं.
