TRENDING:

IPL 2026 : W,W,W...केकेआरला मिळाला नवा हिरा,एका ओव्हरमध्ये मॅच फिरवली, कोण आहे खेळाडू? VIDEO

Last Updated:

कोलकत्ताने नाईट रायडर्सला नवीन हिरा मिळाला आहे. या हिऱ्याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट पटकावून अख्खी मॅच फिरवली आहे.त्यामुळे सराव सामन्यातील त्याची कामगिरी पाहता केकेआरला नवा हिरा मिळाल्याचे बोलले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 : येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामाला जवळपास चार दिवस उरले असताना सर्व फेंचायजी आपआपल्या टीमच्या इंट्रा स्क्वॉड मॅच खेळवते आहे.कोलकत्ताने नाईट रायडर्सने नुकतेच असे सामने खेळवले होते. या सामन्यातून अजिंक्य रहाणेला नवीन हिरा मिळाला आहे. या हिऱ्याने एका ओव्हरमध्ये तीन विकेट पटकावून अख्खी मॅच फिरवली आहे.त्यामुळे सराव सामन्यातील त्याची कामगिरी पाहता केकेआरला नवा हिरा मिळाल्याचे बोलले जात आहे.
kolkatta knight riders kartik tyagi
kolkatta knight riders kartik tyagi
advertisement

खरं तर आयपीएलआदधी कोलकत्ता नाईट रायडर्सच्या गोल्डन नाईटस आणि पर्पल नाईटस संघात इट्रा स्क्वॉड सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गोल्डन नाईटसकडून खेळणाऱ्या 25 वर्षीय कार्तिक त्यागीने एकाच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल बदलला होता. या सामन्यात त्याने 3 ओव्हरमध्ये 35 धावा देऊन तीन विकेट घेतल्या होत्या.पण या तीन विकेट त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. त्याने स्टार खेळाडू रचिन रविंद्र,सार्थक रंजन आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंना आपला शिकार बनवलं होतं.

advertisement

या सराव सामन्यात धावांचा अक्षरस पाऊल पडला होता.गोल्डन नाईटसने प्रथम फलंदाजी करताना 249 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. पण VJD नियमानुसार पर्पल नाईटसला 190 धावांचे लक्ष्य दिले होते.यावेळी हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. त्यावेळी पर्पल नाईटसला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर शेवटच्या बॉलला 3 धावांची गरज होती. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या राहुल त्रिपाठीने शॉट मारल्यानंतर दोन धावा चोरण्याचा प्रयत्न केला होता. पण तो रन आऊट झाला होता.त्यामुळे अशाप्रकारे कार्तिकचा संघ गोल्डन नाइटसने शेवटच्या बॉलवर हा सामना जिंकला.

advertisement

कार्तिकने डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर गोल्डन नाइटसने हा सामना जिंकला होता.त्यामुळे या सामन्यातून कार्तिकच्या रुपात कोलकत्ताला नवा बॉलर मिळाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 30 लाखाला ताफ्यात घेतलं होतं. त्यामुळे इतक्या कमी किमतीत कोलकत्ताच्या टीमला एक चांगला खेळाडू मिळाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
सर्व पहा

दरम्यान आयपीएलच्या या हंगामात कोलकत्ता नाईट रायडर्सचा पहिला सामना हा रविवारी 29 मार्च 2026 ला मुंबई इंडियन्सविरूद्ध असणार आहे.हा सामना मुंबई इंडियन्सच्या वानखेडेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : W,W,W...केकेआरला मिळाला नवा हिरा,एका ओव्हरमध्ये मॅच फिरवली, कोण आहे खेळाडू? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल