TRENDING:

IPL 2026 : 'मला फरक पडत नाही...', CSK वर विजय अन् तो प्रश्न, रियान पराग कुणावर भडकला?

Last Updated:

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 ची सुरूवात विजयाने केली आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धचा सामना राजस्थानने अगदी सहज जिंकला. सीएसकेने दिलेलं 128 रनचं आव्हान राजस्थानने 12.1 ओव्हरमध्येच फक्त 2 विकेट गमावून पार केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुवाहाटी : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 ची सुरूवात विजयाने केली आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धचा सामना राजस्थानने अगदी सहज जिंकला. सीएसकेने दिलेलं 128 रनचं आव्हान राजस्थानने 12.1 ओव्हरमध्येच फक्त 2 विकेट गमावून पार केलं. मोसमातल्या पहिल्याच विजयानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने जोरदार पलटवार केला आहे. आयपीएलच्या या मोसमाआधी रियान पराग याची राजस्थान रॉयल्सने पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती, त्यानंतर वाद निर्माण झाला होता.
'मला फरक पडत नाही...', CSK वर विजय अन् तो प्रश्न, रियान पराग कुणावर भडकला?
'मला फरक पडत नाही...', CSK वर विजय अन् तो प्रश्न, रियान पराग कुणावर भडकला?
advertisement

राजस्थानच्या टीममध्ये यशस्वी जयस्वाल असतानाही रियान परागला कॅप्टन्सीची जबाबदारी दिली गेल्यामुळे अनेकांनी टीका केली होती. आता सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर रियान परागने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाहेरच्यांची मतं आणि कारण नसताना सुरू असलेला गोंधळ याने मला फरक पडत नाही, असं रियान पराग म्हणाला आहे.

काय म्हणाला रियान पराग?

मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रियान परागने त्याच्या कॅप्टन्सीवर होत असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. 'मी बाहेरून होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे. मी फक्त माझा खेळ आणि माझ्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करत आहे. जर मी माझ्या प्रवासाबद्दल बोलायला लागलो तर उत्तर खूप मोठं होईल. माझ्या खेळापेक्षा जास्त बाहेरच्या गोष्टी बोलल्या जातात, अनेक जण मत देतात, या गोष्टींचा आपल्यावर फरक पडता कामा नये, हे मी शिकलो आहे. मी चांगलं करत आहे आणि यावर्षीही तसंच करेन', असं वक्तव्य रियान परागने केलं आहे.

advertisement

'क्रिकेटची कहाणी कायम निकालांनुसार बदलते, मग तुमचा निर्णय योग्य असो नाहीतर चुकीचा. जर माझ्या आजच्या निर्णयांमुळे चेन्नईने 200 रन केल्या असत्या आणि आमचा पराभव झाला असता, तर मी किती वाईट कर्णधार आहे, माझे निर्णय कसे चुकीचे आहेत, हे बोललं गेलं असतं', असा टोला रियान परागने लगावला.

कॅप्टन्सीवरून परागवर टीका

आयपीएल 2026 आधी राजस्थानने रियान परागला पूर्णवेळ कर्णधार केलं. संजू सॅमसनच्या गैरहजेरीमध्ये 2025 च्या आयपीएलमध्येही रियान पराग राजस्थानचा कर्णधार होता, पण या 8 सामन्यांमध्ये टीमला फक्त 2 विजय मिळाले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत यांनीही परागला कर्णधार करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. खराब रेकॉर्डनंतरही रियान परागला पाठिंबा दिला जात आहे, असं श्रीकांत म्हणाले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सुकट ते खारे मासे, पुण्यातील 95 वर्षे जुनं बोंबील मार्केट, खवय्यांचे आजही आवडते ठिकाण, Video
सर्व पहा

राजस्थानच्या टीममध्ये रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वालसारखे अनुभवी खेळाडू असतानाही रियान परागला कर्णधार करणं काही क्रिकेटपटू आणि चाहत्यांना रुचलं नव्हतं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'मला फरक पडत नाही...', CSK वर विजय अन् तो प्रश्न, रियान पराग कुणावर भडकला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल