TRENDING:

IPL 2026 : मुंबई-राजस्थान सामना संकटात? गुवाहाटीमध्ये पाऊस पडणार? समोर आली मोठी अपडेट!

Last Updated:

आयपीएल 2026 मध्ये सोमवारचा कोलकाता आणि पंजाब यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच एखादा सामना पावसामुळे खेळवला गेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुवाहाटी : आयपीएल 2026 मध्ये सोमवारचा कोलकाता आणि पंजाब यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच एखादा सामना पावसामुळे खेळवला गेला नाही, त्यानंतर आता मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत होईल. आयपीएलच्या या मोसमात राजस्थानने आतापर्यंत त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
मुंबई-राजस्थान सामना संकटात? गुवाहाटीमध्ये पाऊस पडणार? समोर आली मोठी अपडेट!
मुंबई-राजस्थान सामना संकटात? गुवाहाटीमध्ये पाऊस पडणार? समोर आली मोठी अपडेट!
advertisement

राजस्थान-मुंबईच्या सामन्याचा पिच रिपोर्ट

बरसापारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी बॅटिंगला मदत करणारी मानली जाते, त्यामुळे या सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पडून मोठ्या रन व्हायची अपेक्षा आहे. बरसापारामध्ये पहिल्या इनिंगचा सरासरी स्कोअर 160 तर दुसऱ्या इनिंगचा 153 रन आहे.

कसं असणार हवामान?

राजस्थान आणि मुंबई यांच्या सामन्याआधीच गुवाहाटीमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे हा सामनाही संकटात सापडला आहे. गुवाहाटीचं कमाल तापमान 28 डिग्री आणि किमान 18 डिग्री सेल्सियस असेल.

advertisement

दोन्ही टीमचं हेड टू हेड रेकॉर्ड?

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत, यात मुंबईने 16 आणि राजस्थानने 14 मॅच जिंकल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सचा धमाका

रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सची यंदाच्या मोसमातली कामगिरी धमाकेदार झाली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या मागच्या सामन्यात राजस्थानचा 6 रननी विजय झाला होता. बॅटिंगमध्ये ओपनर यशस्वी जयस्वालने 36 बॉलमध्ये 55 रनची आक्रमक खेळी केली, तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या ध्रुव जुरेलने फक्त 42 बॉलचा सामना करून 5 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 75 रन केले. वैभव सूर्यवंशीने 18 बॉलमध्ये 31 रन करून योगदान दिलं.

advertisement

बॉलिंगमध्ये तुषार देशपांडेने 24 रन देऊन 1 विकेट घेतली. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 11 रनची गरज असताना तुषार देशपांडेने राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला. लेग स्पिनर रवी बिष्णोईने 4 ओव्हरमध्ये 41 रन देऊन 4 विकेट घेतल्या.

मुंबईला पराभवाचा धक्का

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

दुसरीकडे मुंबई इंडियन्सना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 162 रन केल्या. सूर्यकुमार यादवच्या 51 आणि रोहित शर्माच्या 35 रन वगळता मुंबईच्या कोणत्याच खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही. बॉलिंगमध्ये दीपक चहर, बुमराह आणि सॅन्टनरने रन रोखल्या, पण शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे आणि कॉर्बिन बॉशची धुलाई झाली. दिल्लीविरुद्धच्या पराभवाआधी मुंबईचा केकेआरविरुद्ध विजय झाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबई-राजस्थान सामना संकटात? गुवाहाटीमध्ये पाऊस पडणार? समोर आली मोठी अपडेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल