TRENDING:

IPL 2026 Schedule : वर्ल्ड कपनंतर पुन्हा सुरू होणार T20 चा थरार, आयपीएल वेळापत्रकाची घोषणा!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2026 च्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 28 मार्चपासून आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात होणार आहे. तर आयपीएल 2026 ची फायनल 31 मे रोजी होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होईल, तर फायनलही चिन्नास्वामीमध्ये होणार आहे. 28 मार्चला आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2026 चा पहिला सामना होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही लढत पार पडेल.
वर्ल्ड कपनंतर पुन्हा सुरू होणार T20 चा थरार, आयपीएल वेळापत्रकाची घोषणा!
वर्ल्ड कपनंतर पुन्हा सुरू होणार T20 चा थरार, आयपीएल वेळापत्रकाची घोषणा!
advertisement

आयपीएल 2025 मध्ये विराट कोहलीच्या आरसीबीने पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली होती. आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का दिला होता. यंदाच्या आयपीएलमध्येही 10 टीम प्रत्येकी 14 मॅच खेळतील, यातल्या 7 मॅच होम ग्राऊंडवर आणि उरलेल्या 7 मॅच बाहेरच्या मैदानात होणार आहेत. लीग स्टेजनंतर टॉप-4 टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. रायपूरमध्ये पहिल्यांदाच आयपीएलचे सामने होणार आहेत. आरसीबी त्यांच्या दोन मॅच रायपूरमध्ये खेळणार आहेत. तर राजस्थान रॉयल्सचे 3 सामने गुवाहाटी आणि 4 सामने जयपूरमध्ये होतील.

advertisement

advertisement

सामना क्रमांक ठिकाण संघ तारीख वेळ
1 बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद शनिवार, 28 मार्च 7:30 PM
2 मुंबई मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स रविवार, 29 मार्च 7:30 PM
3 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स सोमवार, 30 मार्च 7:30 PM
4 न्यू चंदीगड पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स मंगळवार, 31 मार्च 7:30 PM
5 लखनऊ लखनऊ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स बुधवार, 1 एप्रिल 7:30 PM
6 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद गुरुवार, 2 एप्रिल 7:30 PM
7 चेन्नई चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स शुक्रवार, 3 एप्रिल 7:30 PM
8 दिल्ली दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स शनिवार, 4 एप्रिल 3:30 PM
9 अहमदाबाद गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स शनिवार, 4 एप्रिल 7:30 PM
10 हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद vs लखनऊ सुपर जायंट्स रविवार, 5 एप्रिल 3:30 PM
11 बेंगळुरू RCB vs चेन्नई सुपर किंग्स रविवार, 5 एप्रिल 7:30 PM
12 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स सोमवार, 6 एप्रिल 7:30 PM
13 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स मंगळवार, 7 एप्रिल 7:30 PM
14 दिल्ली दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स बुधवार, 8 एप्रिल 7:30 PM
15 कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स vs लखनऊ सुपर जायंट्स गुरुवार, 9 एप्रिल 7:30 PM
16 गुवाहाटी राजस्थान रॉयल्स vs RCB शुक्रवार, 10 एप्रिल 7:30 PM
17 न्यू चंदीगड पंजाब किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद शनिवार, 11 एप्रिल 3:30 PM
18 चेन्नई चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स शनिवार, 11 एप्रिल 7:30 PM
19 लखनऊ लखनऊ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स रविवार, 12 एप्रिल 3:30 PM
20 मुंबई मुंबई इंडियन्स vs RCB रविवार, 12 एप्रिल 7:30 PM

advertisement

आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रकच जाहीर करण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या राज्यांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल.

advertisement

मुंबई-चेन्नई सगळ्यात यशस्वी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडाक्याच्या उन्हात वाघोबाचा थाट, सिद्धार्थ उद्यानात बसविण्यात आली खास कूलिंग व्यवस्था, Video
सर्व पहा

आयपीएलचा यंदाचा 19 वा मोसम आहे. आतापर्यंतच्या 18 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या सगळ्यात यशस्वी टीम आहेत. मुंबई आणि चेन्नई यांनी आतापर्यंत 5-5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, केकेआरने 3 वेळा आयपीएल जिंकली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Schedule : वर्ल्ड कपनंतर पुन्हा सुरू होणार T20 चा थरार, आयपीएल वेळापत्रकाची घोषणा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल