पंजाबविरुद्धच्या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर 3.4 ओव्हरमध्ये केकेआरने 2 विकेट गमावून 25 रन केल्या होत्या, पण तेव्हाच पावसाला सुरूवात झाली. केकेआरला अडचणीत आणल्यानंतर पावसाला सुरूवात झाल्यामुळे पंजाबला मात्र हातात असलेला आणखी एक पॉईंट गमावल्याचं दु:ख झालं असेल. हा सामना जिंकला असता तर पंजाबचे 6 पॉईंट्स झाले असते.
advertisement
केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना रद्द झाल्यानंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यरने एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यात तिने केकेआरवर निशाणा साधला आहे.
श्रेयसच्या बहिणीने चुकता केला जुना हिशोब?
केकेआरने 2024 साली आपली तिसरी आणि शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार होता. पण पुढच्याच मोसमात केकेआरने श्रेयस अय्यरला रिलीज केलं, ज्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. 2025 मध्ये श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या टीममध्ये आला आणि त्यांचा कर्णधार झाला. यानंतर त्याने आपल्या पहिल्याच मोसमात पंजाबला आयपीएल 2025 च्या फायनलमध्येही पोहोचवलं. यंदाच्या मोसमातही पंजाबची टीम उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
श्रेष्ठा अय्यरने केकेआरला डिवचलं
सोमवारी कोलकात्यामध्ये पाऊस पडल्यामुळे केकेआर आणि पंजाब यांच्यातला सामना रद्द झाला, त्यानंतर श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यरने एक व्हिडिओ शेअर केला. 'पंजाबींचं मन खूप मोठं असतं, जा देऊन टाकला एक पॉईंट', असं श्रेष्ठा अय्यर या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.
श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यर हिचे इन्स्टाग्रामवर 3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची बहिण असल्यामुळे ती चर्चेतही असते. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी श्रेष्ठा डान्सचे व्हिडिओही शेअर करते.
