TRENDING:

IPL 2026 : 6,6,4,4,4,4,4... 231 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, खासदाराच्या मुलाने फिक्स केली जागा!

Last Updated:

आयपीएल 2026 चा पहिला सामना आता आठवड्यावर येऊन ठेपला आहे. 19 व्या हंगामाची पहिली मॅच 28 मार्चपासून सुरू होणार आहे, त्याआधी सर्व 10 टीमकडून सरावाला सुरूवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 चा पहिला सामना आता आठवड्यावर येऊन ठेपला आहे. 19 व्या हंगामाची पहिली मॅच 28 मार्चपासून सुरू होणार आहे, त्याआधी सर्व 10 टीमकडून सरावाला सुरूवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने आयपीएलआधी प्रॅक्टिस मॅचही खेळली. या प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळाडूंना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं. पहिल्या टीमचं नाव पर्पल नाईट्स आणि दुसऱ्या टीमचं नाव गोल्ड नाईट्स ठेवण्यात आलं होतं.
6,6,4,4,4,4,4... 231 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, खासदाराच्या मुलाने फिक्स केली जागा!
6,6,4,4,4,4,4... 231 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, खासदाराच्या मुलाने फिक्स केली जागा!
advertisement

केकेआरच्या गोल्ड नाईट्सकडून खेळताना खासदार पप्पू यादव यांचा मुलगा साथर्क रंजन याने आक्रमक बॅटिंग केली. सार्थक रंजनने 16 बॉलचा सामना करून 231.25 च्या स्ट्राईक रेटने 37 रन केले.

वैभव अरोरावर आक्रमण

सार्थक रंजनने पर्पल नाईट्सचा फास्ट बॉलर वैभव अरोरावर आक्रमण केलं. वैभव अरोराच्या एकाच ओव्हरमध्ये सार्थकने दोन सिक्स आणि दोन फोरच्या मदतीने 20 रन काढले. एवढंच नाही तर त्याने अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागीच्या ओव्हरमध्ये एकूण 3 फोर मारल्या.

advertisement

मुझरबानीने घेतली विकेट

सार्थक रंजन मोठा स्कोअर करेल असं वाटत होतं, पण ब्लेसिंग मुझरबानीने त्याची विकेट घेतली. मुझरबानी हा झिम्बाब्वेचा फास्ट बॉलर आहे, ज्याने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. बांगलादेशच्या मुस्तफिजुरला आयपीएल खेळण्यावर बंदी घातल्यामुळे मुझरबानीची केकेआरच्या टीममध्ये निवड झाली.

advertisement

सार्थकवर 30 लाखांची बोली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्षानं मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीचे दर काय?
सर्व पहा

आयपीएल 2026 च्या लिलावात सार्थक रंजन याच्यावर केकेआरने 30 लाखांची बोली लावली. स्थानिक क्रिकेटमध्ये सार्थक रंजन दिल्लीकडून खेळतो. सार्थकने आतापर्यंत 2 प्रथम श्रेणी सामने, 7 लिस्ट ए आणि 5 टी-20 मॅच खेळल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 6,6,4,4,4,4,4... 231 च्या स्ट्राईक रेटने धुतलं, खासदाराच्या मुलाने फिक्स केली जागा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल