कूपर कॉनलीने प्रभसिमरन सिंगसोबत महत्त्वाची पार्टनरशीप केली, पण प्रभसिमरन 37 रनवर आऊट झाल्यानंतर पंजाबची बॅटिंग गडगडली. फक्त 8 रनवर पंजाबने त्यांच्या 4 विकेट गमावल्या, तरीही कॉनली डगमगला नाही आणि त्याने एका बाजूने किल्ला लढवून पंजाबचा विजय निश्चित केला.
प्रसिद्ध कृष्णाची भेदक बॉलिंग
पंजाबला जेव्हा 163 रनचं आव्हान मिळालं, तेव्हा ते हा सामना अगदी सहज जिंकतील असं वाटत होतं, पण प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक बॉलिंगमुळे गुजरातने सामन्यात कमबॅक केलं, एवढच नाही तर गुजरातच्या विजयाच्या आशाही पल्लवीत झाल्या. प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 15 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. प्रसिद्धने श्रेयस अय्यरला 18 रनवर, शशांक सिंगला 4 रनवर आणि मार्कस स्टॉयनिसला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
advertisement
प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये भेदक बॉलिंग केली असली तरी त्याच्या चौथ्या ओव्हरमुळे गुजरातच्या हातातून मॅच गेली. प्रसिद्ध कृष्णाने 19व्या ओव्हरमध्ये तब्बल 14 रन दिल्या, त्यामुळे पंजाबचा विजय सोपा झाला. 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला झेवियर बार्टलेटने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगवर सिक्स मारली, त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला कूपर कॉनलीने फोर मारून पंजाबला विजयाच्या जवळ नेलं. उरलेल्या 4 बॉलमध्ये प्रसिद्धने 4 रन दिल्या. प्रसिद्ध कृष्णाला गुजरात टायटन्सने 9.50 कोटी रुपयांना रिटेन केलं आहे.
गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच पंजाबने मोसमाची सुरूवात विजयाने केली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब एका सामन्यात एका विजयासह चौथ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान पहिल्या, आरसीबी दुसऱ्या आणि मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे.
