काय म्हणाली PV Sindhu?
काही तासांपूर्वी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्या अगदी जवळच एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे सगळीकडे धूर आणि ढिगारा साचला होता. विशेष म्हणजे पीव्ही सिंधूचे कोच या धुराच्या आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ होते, ज्यामुळे त्यांना तिथून जीवाच्या आकांताने पळावे लागले. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत तणावाचा आणि भीतीदायक होता, असं पीव्ही सिंधू हिने म्हटलं आहे.
advertisement
सुदैवाने, पीव्ही सिंधू आणि तिची संपूर्ण टीम आता सुरक्षित असून त्यांना अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुबई विमानतळ कर्मचारी आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे आमचा जीव वाचला, असे सिंधूने सांगितले. या कठीण काळात दुबईतील इंडियन हायकमिशनने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आणि सततच्या मदतीबद्दल तिने विशेष आभार मानले आहेत.
सध्या ही संपूर्ण टीम या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असून थोडा वेळ विश्रांती घेत आहे. परिस्थिती निवळण्याची आणि सर्व काही सुरळीत होण्याची ते वाट पाहत आहेत. "आम्ही सुरक्षित आहोत आणि आशा सोडून दिलेली नाही," अशा शब्दांत सिंधूने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. या घटनेमुळे 2026 च्या या क्रीडा हंगामात भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सध्या, आम्ही परिस्थिती निवळण्याची वाट पाहत असताना थोडी विश्रांती घेण्याचा आणि आशेवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सुरक्षित आहोत आणि आशा सोडून दिलेली नाही, असंही पीव्ही सिंधू म्हणाली आहे.
