कृणाल पांड्याने या विजयानंतर सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केली नाही. तर दुसरीकडे हार्दिकची वहिनी पंखुडीनेही कोणतीही पोस्ट केली नाही. कृणाल आणि त्याची पत्नी पंखुडी पूर्ण वर्ल्ड कपमध्ये स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि हार्दिकला चिअर करतानाही दिसले नाहीत.
हार्दिक-माहिकाच्या नात्यामुळे वाद?
टीम इंडियाने फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा चर्चेत आली. वर्ल्ड कप सुरू असतानाही माहिका प्रत्येक ठिकाणी हार्दिकसोबत होती, पण हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी कुठेही दिसल्या नाहीत.
advertisement
पांड्या बंधूंमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. हार्दिक आणि कृणाल यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळायला सुरूवात केली. 2016 ते 2021 दरम्यान दोघांनी टीमला 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यात मदत केली. हार्दिक सध्या मुंबई इंडियन्सकडे आहे, तर कृणाल पांड्या गतविजेत्या आरसीबीच्या टीममध्ये आहे.
हार्दिक आणि कृणाल यांच्यातल्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आणखी वाढल्या जेव्हा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलला स्टेडियममध्ये कृणाल आणि त्याची पत्नी पंखुडी दिसले नाहीत. भावाला एवढं यश मिळाल्यानंतरही कृणालने सोशल मीडियावर एकही पोस्ट केली नाही, यानंतर चाहत्यांकडून हार्दिक आणि कृणाल यांच्यात काही वाद झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हार्दिक आणि कृणाल यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या. हार्दिक आणि नताशा वेगळे झाल्यानंतर कृणाल आणि त्याची पत्नी नताशा आणि त्यांचा मुलगा अगस्त्यसोबत दिसले होते, तेव्हाही भावा-भावांमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं गेलं होतं.
