नामिबिया विरूद्ध फलंदाजी करण्यासाठी टीम इंडियाकडून ईशान किशन आणि संजू सॅमसन मैदानात आले होते.पण संजूचा हा वर्ल्ड कपमधला डेब्यू सामना होता. या डेब्यू सामन्यात त्याने 8 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली होती. खरं तर संजूने आणखी धावा करणे अपेक्षित होते पण तो अपयशी ठरला होता.संजू बाद झाल्यानंतर ईशान किशनने स्ट्राईक घेऊन धुलाई करायला सूरूवात केली होती.
advertisement
ईशान किशनने जेमी स्मिथला सहाव्या ओव्हरला चोप चोप चोपला होता. ईशान क़डून स्मिथचा पहिला बॉल डॉट झाला.त्यानंतर किशनने लागोपाठ चार षटकार मारले. शेवटच्या बॉलवर देखील त्याने षटकाराचा प्रयत्न केला. पण बॉल चौकार गेला होता.त्यामुळे जेमी स्मिथच्या ओव्हरमध्ये ईशान किशनने 28 धावा काढल्या होत्या.
विशेष म्हणजे या धावा काढून ईशान किशनने वर्ल्ड कप 2026 मधली दुसरी सर्वात वेगवान हाफ सेंच्यूरी ठोकली. ईशानने 20 बॉलमध्ये ही हाफ सेंच्यूरी ठोकली होती. ईशान आधी या वर्ल्डकपमध्ये शनाकाने 19 बॉल हाफ सेंच्यूरी केली होती.त्यामुळे ही या वर्ल्ड कपमधली पहिली फास्टेट हाफ सेंच्यूरी होती.
विशेष म्हणजे या वेगवान हाफ सेंच्यूरीनंतर ईशान किशन 24 बॉलमध्ये 61 धावा करून बाद झाला.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार मारले आहेत. या त्याच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 86 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर ईशान किशन कॅच आऊट झाला होता. पण तो क्रिजवर असताना त्याने भारताला 100 धावांच्या पार नेले होते.
