TRENDING:

Iran War : वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियाचा विकेट कीपर दुबईमध्ये अडकला, इराणमधली परिस्थिती चिघळली!

Last Updated:

अमेरिका आणि इज्रायलच्या हल्ल्यात इराणचं नेतृत्व उद्ध्वस्त झालं आहे. अमेरिका-इज्रायल आणि इराणच्या या वादात आखाती देशही धुमसत आहेत. विमानसेवा बंद झाल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू दुबईमध्ये अडकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शनिवारी अमेरिका आणि इज्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये अमेरिका आणि इज्रायलच्या सैन्याने हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले केले, ज्यात इराणचं राजकीय आणि लष्करी नेतृत्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियाचा विकेट कीपर दुबईमध्ये अडकला, इराणमधली परिस्थिती चिघळली!
वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियाचा विकेट कीपर दुबईमध्ये अडकला, इराणमधली परिस्थिती चिघळली!
advertisement

खामोनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य, संरक्षण मंत्री नासिरजादेह, इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनलर अब्दुलरहीम मौसावी, आयआरजीसी कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपौर, वरिष्ठ सुरक्षा सल्लागार अली शामखानी, लष्करी गुप्तचर प्रमुख सलाह असादी आणि सर्वोच्च नेत्याच्या लष्करी ब्युरोचे प्रमुख मोहम्मद शिराजी हे जवळजवळ 30 तासांच्या अमेरिकन आणि इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत.

advertisement

इराणवरच्या या हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील हवाई क्षेत्र बंद झालं आहे. एमिरेट्स आणि एअर इंडियासह अनेक विमानांच्या उड्डाणांना अडथळे निर्माण झाले आहेत. एअर इंडियाने आखाती देशांमधील सर्व उडाणं रद्द केली आहे, ज्यात प्रामुख्याने अबू धाबी, दम्माम, दोहा, दुबई, जेद्दाह, मस्कत, रियाध आणि तेल अवीव यांचा समावेश आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे दुबई विमानतळाने सर्व ऑपरेशन्स अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत.

advertisement

भारतीय क्रिकेटपटू अडकला

विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे आखाती देशांमध्ये भारतीय नागरिकही अडकले आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियरदेखील सध्या दुबईमध्ये आहेत, पण विमानसेवा बंद झाल्यामुळे इंजिनियर दुबईमध्येच आहेत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी दिली आहे.

पी.व्ही.सिंधूही अडकली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

दरम्यान भारताला दोन वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकवून देणारी पी.व्ही.सिंधू देखील दुबईमध्ये अडकली आहे. दुबईमधली परिस्थिती भीतीदायक आहे, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे, तिथे आम्हाला स्फोटांचे आवाज ऐकू आले, असं सिंधू म्हणाली आहे. 3 तारखेपासून सिंधू ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे, पण ती सध्या कोचसोबत दुबईमध्ये अडकली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Iran War : वर्ल्ड कप सुरू असतानाच टीम इंडियाचा विकेट कीपर दुबईमध्ये अडकला, इराणमधली परिस्थिती चिघळली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल