मिळालेल्या माहितीनुसार, फुरकान भट असे या खेळाडूचे नाव आहे. तो जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळत होता. यावेळी फुरकानच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज दिसला होता,ज्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशी सुरू केली.संघाचे आयोजक जाहिद भट यांनी आपल्याला या घटनेची माहिती नव्हती अशी माहितील फोन कॉलद्वारे पोलिसांना दिली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी फुरकान भटची चौकशी सूरू केली आहे.
advertisement
हा सामना जम्मूमधील केसी स्पोर्ट्स क्लबमध्ये झाला. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरकान भटला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. सामन्यादरम्यान अशा चिन्हाचा वापर करण्यामागील हेतू आणि आयोजकांकडून परवानगी घेण्यात आली होती का हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
कोण आहे फुरकान भट?
जम्मू आणि काश्मीरचा तरुण क्रिकेटपटू फुरकान भट हा स्थानिक क्रिकेटपटू आहे, जो जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो. ही लीग काश्मीर खोऱ्यात क्रिकेट उत्साह वाढवण्यासाठी एक स्थानिक स्पर्धा आहे. जिथे तरुण प्रतिभा त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करतात. फुरकान हा अशा तरुण काश्मिरींपैकी एक आहे ज्यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांची आवड शोधली आहे. क्रिकेट खोऱ्यात नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. परवेझ रसूल आणि उमरान मलिक सारखे खेळाडू येथून उदयास आले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. फुरकानसारखे स्थानिक खेळाडू देखील हे स्वप्न पूर्ण करतात. या वादानंतर, फुरकानची कारकीर्द धोक्यात आली आहे.
भाजपची गंभीर टीका
या घटनेवर भाजपचे प्रवीण खंडेलवाल संतापले असून त्याला देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्हाला भारतात राहायचे असेल तर तुम्ही भारतीय ध्वज फडकावा. जो कोणी पॅलेस्टिनी ध्वज फडकावतो त्याला भारताबद्दल प्रेम नाही असे मानले जाईल. ज्यांना भारतावर प्रेम नाही त्यांनी तेथून निघून जावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगचे आयोजक जाहिद भट यांचीही पोलिस चौकशी करत आहेत. लीग दरम्यान नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते का आणि अशा कृतींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता का, हे तपास यंत्रणांना स्पष्ट करायचे आहे. या प्रकरणाच्या संवेदनशील स्वरूपामुळे, प्रत्येक पैलूची चौकशी केली जात असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
