TRENDING:

रोहितसारखा बिग हिटर पण पॅलेस्टाईनचा झेंडा लावून खेळला भारतीय खेळाडू, पोलिसांनी थेट मुसक्या आवळल्या; पाहा कोण?

Last Updated:

Cricketer Furqan Bhat Palestine helmet : जम्मू आणि काश्मीरचा तरुण क्रिकेटपटू फुरकान भट हा स्थानिक क्रिकेटपटू आहे जो जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो. ही लीग काश्मीर खोऱ्यात क्रिकेट उत्साह वाढवण्यासाठी एक स्थानिक स्पर्धा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Palestine Flag on Helmet : जम्मूमध्ये सध्या एका क्रिकेट स्पर्धेमुळे मोठे वातावरण तापलं आहे. जम्मूच्या स्पर्धेतील एका मॅच दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मैदानावर खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा एका वेगळ्याच कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून, या प्रकरणाचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. यावेळी एका खेळाडूचं हेलमेट यावेळी चर्चेत राहिलं. जम्मू-कश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे आयोजक आणि खेळाडू दोघंही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय घडलं? प्रकरण काय? जाणून घ्या.
Furqan Bhat over Palestine Flag on Helmet During Match
Furqan Bhat over Palestine Flag on Helmet During Match
advertisement

फुरकान भट्ट नावाचा खेळाडू

जम्मू काश्मीरमधील क्रिकेट स्पर्धेतील एका मॅच दरम्यान फुरकान भट्ट नावाचा खेळाडू खेळत होता. या खेळाडूने आपल्या हेल्मेटवर पॅलेस्टाईन देशाचा झेंडा लावला होता. आधी कुणाच्याही ही बाब लक्षात आली नाही. परंतू व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आता स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आहेत. नियमानुसार मॅच खेळताना खेळाडूंना अशा प्रकारची चिन्हे वापरण्याची परवानगी नसते, त्यामुळेच आता या कृतीची सखोल चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहत आहे. हेल्मेटवरील पॅलेस्टिनी ध्वजावरून झालेल्या वादानंतर, भट्ट यांना जम्मू चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

advertisement

advertisement

झाहीद भट यांचीही चौकशी सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी फुरकान भट्ट याला चौकशीसाठी पाचारण केले असून, हेल्मेटवर झेंडा लावण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, याबाबत जबाब नोंदवला जात आहे. केवळ खेळाडूच नाही, तर या लीगचे मुख्य आयोजक झाहीद भट यांचीही चौकशी सुरू झाली आहे. आयोजकांनी खेळाडूंच्या किट आणि ड्रेस कोडबाबत कोणते नियम लावले होते आणि ही घटना घडत असताना कोणाचे लक्ष का गेले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर कोणत्याही कृतीमुळे सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था किंवा सामाजिक सौहार्द बिघडत असल्याचा संशय असेल, तर पोलिसांना चौकशी करण्याचा आणि कारवाई करण्याचा अधिकार आहे.

advertisement

क्रीडा वर्तुळात रंगली चर्चा

जम्मू-कश्मीर पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक आणि कायदेशीर बाजूंनी अभ्यास करत असून, गरज पडल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मैदानावर स्पोर्ट्समन स्पिरिट राखणे महत्त्वाचे असते, मात्र अशा वादांमुळे खेळाचे वातावरण बिघडण्याची चर्चा सध्या क्रीडा वर्तुळात रंगली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणी आपला अंतिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

advertisement

कोण आहे फुरकान भट?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळद खातीये चांगलाच भाव, शेवगा आणि डाळींबाला आज काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचा तरुण क्रिकेटपटू फुरकान भट हा स्थानिक क्रिकेटपटू आहे जो जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो. ही लीग काश्मीर खोऱ्यात क्रिकेट उत्साह वाढवण्यासाठी एक स्थानिक स्पर्धा आहे. फुरकान भट हा रोहित शर्मासारखा बिग हिटर मानला जातो. क्रिकेट खोऱ्यात नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. परवेझ रसूल आणि उमरान मलिक सारखे खेळाडू येथून उदयास आले आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. फुरकान सारखे स्थानिक खेळाडू देखील हे स्वप्न जगतात.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहितसारखा बिग हिटर पण पॅलेस्टाईनचा झेंडा लावून खेळला भारतीय खेळाडू, पोलिसांनी थेट मुसक्या आवळल्या; पाहा कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल