खरं तर टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन्स बनवल्यानंतर सर्वच खेळाडू विविध मुलाखती आणि कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. नुकत्याच इंडिया टूडेच्या एका कॉनक्लेवमध्ये देखील संजू सॅमसन पोहोचला होता.त्याच्यासोबत यावेळी अभिषेक शर्मा देखील होता. यावेळी दोघांनी मैदानावरचे आणि ड्रेसिंग रुमचे अनेक किस्से सांगितले होते.
दरम्यान संजू सॅमसन नुकताच ACES अवॉर्ड सोहळ्याला गेला होता. या सोहळ्याला संजू आल्याचे चिमुकल्या चाहत्यांना कळताच तेसंजूची जर्सी घालून त्याची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. हे चिमुकले चाहते संजूची वाट पाहत अनेक तास ताटकळत उभे होते.पण संजू काय आलाच नाही.त्यामुळे चिमुकले चाहते प्रचंड निराश झाले होते. पण नंतर त्यांना मोठं गिफ्ट मिळालं.
advertisement
त्याचं झालं असं की या चिमुकल्यांना निराश झालेल पाहून त्याच कार्यक्रमात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ याने संजूच्या त्या जर्सीवर स्वत:ची ऑटोग्राफ दिली.त्यांच्यानतर संजूच्या चाहत्यांचे चेहरे खुलले आणि ते निघून गेले
दरम्यान ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ यांना Sportstar Aces Awards 2026 मध्ये International Icon Award ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अमूलचे MD जयेन मेहता आणि सुनील गावस्कर यांच्या हस्ते देण्यात आला. मॅकग्राथ यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत 563 टेस्ट विकेट्स घेतल्या आणि तीन वर्ल्ड कप (1999,2003,2007)जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.पुरस्कार सोहळ्यात मॅकग्राथ यांनी सचिन तेंडुलकर यांच्याविरुद्धच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या आणि क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाची चर्चा केली होती.
