TRENDING:

Rohit Pawar : केदार जाधवचा रोहित पवारांना धक्का, कुटुंबाची 'मेगा भरती' भोवली, MCA निवडणूक स्थगित

Last Updated:

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मंगळवार 6 जानेवारीला होणारी निवडणूक स्थगित झाल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
केदार जाधवचा रोहित पवारांना धक्का, कुटुंबाची 'मेगा भरती' भोवली, MCA निवडणूक स्थगित
केदार जाधवचा रोहित पवारांना धक्का, कुटुंबाची 'मेगा भरती' भोवली, MCA निवडणूक स्थगित
advertisement

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मंगळवार 6 जानेवारीला होणारी निवडणूक स्थगित झाल्याची माहिती समोर आली आहे. एमसीए निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्यांच्या यादीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे, रोहित पवार यांच्या सासरची मंडळी आणि ज्यांच्या क्रिकेटशी संबंध नाही, असे नातेवाईक, राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावं मतदार यादीत घुसवल्याचा आरोप रोहित पवारांवर झाला होता.

advertisement

यादीमधील मतदारांचं क्रिकेटसाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थि करत माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे वाद?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची मतदार यादी 25 डिसेंबर रोजी जाहीर झाली. या यादीमध्ये अचानक 401 आजीव सभासदांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे जनरल बॉडीची सदस्यसंख्या 150 वरून थेट 600 च्या पार गेली, असा आरोप केदार जाधवने केला. या नवीन सदस्यांमध्ये 25 जण मागील कौन्सिल सदस्यांचे जवळचे नातेवाईक असून, 18 जण रोहित पवार यांचे नातेवाईक आहेत, तर 56 सदस्य त्यांच्या व्यवसायाशी किंवा वैयक्तिक कामाशी संबंधित असल्याचा दावा जाधवने केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 37 नेतेही या यादीत असल्याचं केदार जाधव म्हणाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोयाबीन दर वाढ, कापूस आणि तुरीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

केदार जाधव हादेखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उभा आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले. नवीन सदस्यांची नियुक्ती ही नियमानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील समितीने केली असल्याचं रोहित पवार समर्थकांनी सांगितलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Pawar : केदार जाधवचा रोहित पवारांना धक्का, कुटुंबाची 'मेगा भरती' भोवली, MCA निवडणूक स्थगित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल