TRENDING:

आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोयाबीन दर वाढ, कापूस आणि तुरीला काय मिळाला भाव? Video

Last Updated:

5 जानेवारी रोज सोमवारला राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या आवक व दरांमध्ये सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. कपाशीचे दर स्थिर असतानाच कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारभावात वाढ नोंदवण्यात आली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 5 जानेवारी रोज सोमवारला राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या आवक आणि दरांमध्ये सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. कपाशीचे दर स्थिर असतानाच कांदा, सोयाबीन आणि तुरीच्या बाजारभावात वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? पाहुयात.
advertisement

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 8 हजार 008 क्विंटल इतकी झाली. 2 हजार 300 क्विंटल सर्वाधिक आवक यवतमाळ मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीतकमी 7500 ते जास्तीत जास्त 7700 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आवक झालेल्या कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. रविवारी मार्केटमध्ये कपाशीची आवक झाली नाही. शनिवारी मिळालेला कपाशीचा दर स्थिर आहे.

advertisement

Success Story: तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग! दोडका शेतीतून कमावतोय लाखोंचं उत्पन्न

कांद्याच्या दरात वाढ

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 47 हजार 028 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 95 हजार 908 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 485 ते जास्तीत जास्त 1722 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या लाल कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये बाजारभाव मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

सोयाबीनच्या सर्वाधिक दरात वाढ

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 58 हजार 005 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 14 हजार 773 क्विंटल सर्वाधिक आवक लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4213 ते जास्तीत जास्त 4904 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजार भाव जळगाव आणि सातारा मार्केटमध्ये मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

तुरीच्या दरात लक्षणीय वाढ 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 20 हजार 309 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 5 हजार 692 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 5600 ते 7550 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आलेल्या 51 क्विंटल काळ्या तुरीला 8600 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. रविवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
आठवड्याच्या पहिल्याचं दिवशी सोयाबीन दर वाढ, कापूस आणि तुरीला काय मिळाला भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल