Success Story: तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग! दोडका शेतीतून कमावतोय लाखोंचं उत्पन्न

Last Updated:

पैठण तालुक्यातील कातपूर येथे अशोक आढाव हे विविध प्रकारच्या पालेभाज्यांची शेती करत असतात. सध्या ते दहा गुंठे क्षेत्रामध्ये दोडका भाजीची शेती करत आहेत. दररोज बाजारात पाच ते सहा दोडक्यांच्या कॅरेटची विक्री केली जाते.

+
छत्रपती

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील शेतकऱ्यानं चालवलं डोकं; दोडका शेतीतून लाखोंचे उ

छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील कातपूर येथे अशोक आढाव हे विविध प्रकारच्या पालेभाज्यांची शेती करत असतात. सध्या ते दहा गुंठे क्षेत्रामध्ये दोडका भाजीची शेती करत आहेत. दररोज बाजारात पाच ते सहा दोडक्यांच्या कॅरेटची विक्री केली जाते. एका कॅरेटला 500 ते 600 रुपये भाव मिळतो. असे एकूण प्रत्येकी दिवसाला 3000 हजार रुपयांची कमाई आढाव यांची होते, त्यामुळे 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये अशोक यांना 1.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा अशोक आढाव यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना व्यक्त केली.
शेतामध्ये भेंडी, टोमॅटो, वांगे, काकडी यांसह विविध पालेभाज्यांचे उत्पादन अशोक आढाव घेत असतात. त्यामुळे असाच आगळावेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी दहा गुंठे क्षेत्रात पालेभाज्यांमधील दोडके या भाजीची लागवड केली. पाच बाय पाच वर दोडक्याची लागवड करण्यात आली, तसेच पाण्याची व्यवस्थापन म्हणून ठिबक सिंचनाचा वापर देखील या ठिकाणी केला जातो. याबरोबरच 10-26-26 या खताचा डोस या झाडांना देण्यात येतो. तसेच झाडे टिकून राहावे म्हणून बुरशीनाशक या औषधाची फवारणी देखील पिकांवर केली जाते.
advertisement
विशेषतः झाड खाली जमिनीवर येऊ नये म्हणून बांबूंचा देखील वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. आतापर्यंत या दोडका पिकातून चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न निघाल्याचे सांगितले जाते. तरुणांसह इतर शेतकऱ्यांनी देखील दोडका शेती नक्कीच करायला हवी, कारण की दररोज या शेतीतून पैसे मिळतात. जसं पीक विक्री होईल त्या पद्धतीने दररोज 3000, ते 4000 हजार रुपये कमाई होते. विशेषतः चांगले उत्पादन घेण्यासाठी औषध फवारणीची काळजी घेणे आवश्यक आहे, तरुणांनी या शेतीत मेहनत घेतल्यास नक्कीच यातून चांगली उत्पन्न मिळवता येईल.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग! दोडका शेतीतून कमावतोय लाखोंचं उत्पन्न
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement