advertisement

शाळेत जायला पायात चप्पल नव्हती, अनवाणी चालणाऱ्या ज्योती वाघमारे यांचा खासदार होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता?

Last Updated:
वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले.
1/9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी दिली. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते स्पर्धेत असताना वाघमारेंनी उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळात मोठे धक्कातंत्र दिले.

2/9
राज्यसभेसाठी  अनेकजण इच्छुक असताना ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या  अभ्यासू आणि आक्रमक नेत्या कोण आहेत? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

3/9
डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे

4/9
वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले.

5/9
उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.  मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.

6/9
मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.  शिवसेना पक्षात ऐतिहासिक उठाव झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.

7/9
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.  मागील अडीच वर्षात विविध मंचांवर आणि चर्चासत्रात शिवसेना आणि माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या ऐतिहासिक उठावाबाबत सडेतोड आणि मुद्देसूद बाजू मांडत शिवसेना प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.

8/9
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये केलेली भाषणं त्यांच्या वक्तृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.  शिवसेना नेतृत्वावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून विखारी भाषेत सडेतोड उत्तरं देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

9/9
 महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सखोल अभ्यास आहे.

How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement