advertisement

Sagar Mohalkar: फक्त 3 सेकंद लागले, तरुणाला उचलून खाली आपटलं, सागर मोहोळकरचा जिममधला VIDEO व्हायरल

Last Updated:

सागर हा जिममध्ये आला आणि त्याने एका तरुणाला थांबवलं. त्याच्याशी कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. 

News18
News18
अहिल्यानगर : गुंड आणि पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे. कधी काळी पैलवान असलेला खेळाडू गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये कसा गुंड झाला आणि मारेकऱ्यांचा शिकार झाला, याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. अशातच आता सागर मोहोळकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका जिममध्ये त्याने तरुणाला विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात मोहोळकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण, गुंडगिरी करण्यात सागर का कमी नव्हता. एका जिममध्ये घुसून सागरने एका तरुणाला उचलून खाली आपटलं होतं.
advertisement
[video width="854" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/nagpur-crime-2026-03-e64bc479a78e74292f0581107dd62f45.mp4"][/video]
हा व्हिडीओ मागील वर्षी मे २०२५ मधला असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, सागर हा जिममध्ये आला आणि त्याने एका तरुणाला थांबवलं. त्याच्याशी कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली.  त्यानंतर या तरुणाची कॉलर पकडून त्याला पुढे आणलं आणि कानाखाली मारली. सागर तिथेच थांबला नाही, पुढे त्याने या तरुणाला पाठीमागून पकडलं आणि पैलवान स्टाईलमधून उचलून खाली आपटलं. खाली आदळल्यामुळे या तरुणाला मार लागला, त्याचा दुसरा मित्र तिथे आला आणि त्याला तिथून घेऊन गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणात आणि सागरमध्ये काय वाद होता, याची माहिती समोर आली नाही.
advertisement
सागरला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवलं
दरम्यान,  सागर मोहोळकर काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. गुरुवारी तो जामखेड परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sagar Mohalkar: फक्त 3 सेकंद लागले, तरुणाला उचलून खाली आपटलं, सागर मोहोळकरचा जिममधला VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement