Knowledge : कारची 'स्टेपनी' इतर टायरपेक्षा लहान का असते? कंपन्यांची ही कंजूसी नाही, तर 'स्मार्ट इंजिनीअरिंग'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कारचे इतर चार टायर्स मोठे आणि चकचकीत असतात, पण ही स्टेपनी मात्र आकाराने छोटी आणि दिसायला काहीशी वेगळी का असते?
लाँग ड्राईव्हवर असताना किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईत असताना अचानक कारचं टायर 'पंक्चर' झालं की आपल्या कपाळावर आठ्या येतात. वैतागून आपण डिक्की उघडतो आणि 'स्टेपनी' बाहेर काढतो. पण तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते... ती म्हणजे, कारचे इतर चार टायर्स मोठे आणि चकचकीत असतात, पण ही स्टेपनी मात्र आकाराने छोटी आणि दिसायला काहीशी वेगळी का असते?
advertisement
अनेकांना वाटतं की, कार कंपनीने इथे 'कॉस्ट कटिंग' केली आहे किंवा आपल्याला फसवून छोटं टायर दिलं आहे. पण मंडळी, असं अजिबात नाही. यामागे ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगचं एक मोठं डोकं आणि तुमचीच सोय दडलेली आहे. या छोट्या टायरला तांत्रिक भाषेत 'स्पेस सेव्हर' (Space Saver) किंवा 'डोनट टायर' म्हणतात. चला तर मग, या 'छोट्या टायर'मागचं 'मोठं' गुपित उलगडूया.
advertisement
मायलेज वाढवण्यासाठी वजनात कपात कारचं वजन जितकं जास्त, तितकं इंधन जास्त लागतं. जर स्टेपनी सुद्धा रेग्युलर टायरसारखीच मोठी आणि जड दिली, तर कारला आयुष्यभर ते अतिरिक्त वजन वाहावं लागेल. यामुळे कारच्या मायलेजवर परिणाम होतो. स्टेपनी छोटी आणि हलकी ठेवल्यामुळे कारचं एकूण वजन कमी होतं, परिणामी पेट्रोल आणि डिझेलची बचत होते.
advertisement
डिक्कीत मिळते अधिक जागा आजकालच्या कारमध्ये 'बूट स्पेस' म्हणजेच डिक्कीच्या जागेला खूप महत्त्व आहे. जर स्पेयर टायर पूर्ण आकाराचं असेल, तर ते डिक्कीचा मोठा भाग व्यापून टाकतं. छोट्या स्टेपनीमुळे सामान ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त जागा मिळते. विशेषतः हॅचबॅक आणि छोट्या कारमध्ये ही डिझाइन अत्यंत फायदेशीर ठरते.
advertisement
advertisement
advertisement
ही फक्त 'इमर्जन्सी' सोय आहे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, स्टेपनी तुम्हाला लांबचा प्रवास करण्यासाठी दिलेली नसते. ती फक्त तुम्हाला जवळच्या सर्व्हिस सेंटर किंवा पंक्चरच्या दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी असते. स्टेपनी लावून कार 70-80 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने चालवू नये. या टायरवर तुम्ही फक्त 50 ते 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा. टायर लहान असल्यामुळे तुम्हाला आपोआपच कार हळू चालवावी लागते, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगलं आहे.
advertisement
काही तोटे आहेत का? हो, छोटा टायर लावल्यावर कारचं 'ग्राऊंड क्लीअरन्स' थोडं कमी होऊ शकतं आणि कार हाताळताना (Handling) थोडी वेगळी वाटू शकते. त्यामुळे स्टेपनीवर जास्त विसंबून न राहता, लवकरात लवकर मूळ टायर दुरुस्त करून घेणं कधीही उत्तम. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कारची स्टेपनी पाहाल, तेव्हा कंपनीला दोष देऊ नका. उलट, त्यामागे दडलेली स्मार्ट इंजिनीअरिंग आणि तुमच्या इंधनाची होणारी बचत लक्षात घेऊन खुश व्हा.









