advertisement

जग घाबरले, युद्धाचा नवा अंक सुरू होणार; इराणकडून ट्रम्प यांच्या हत्येचे कॉन्ट्रॅक्ट, पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत पाठवले

Last Updated:

US-Israel Iran War: न्यूयॉर्कमधील न्यायालयीन सुनावणीदरम्यान पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंटने धक्कादायक दावा करत इराणी गुप्तचरांनी अमेरिकेतील मोठ्या राजकीय नेत्यांच्या हत्येच्या कटात जबरदस्तीने सहभागी होण्यास भाग पाडल्याचे सांगितले.

News18
News18
न्यूयॉर्क: अमेरिकेतील एका न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बुधवारी एक धक्कादायक खुलासा समोर आला. पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट (वय 47) याने न्यायालयात सांगितले की, इराणी गुप्तचर एजंट्सनी त्याला जबरदस्तीने अमेरिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्या करण्याच्या कटात सहभागी होण्यास भाग पाडले होते. मर्चंटवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
आसिफ मर्चंटने न्यायालयात दावा केला की, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित एका हँडलर मेहरदाद युसुफ याने एप्रिल 2024 मध्ये त्याला अमेरिकेत पाठवले. त्या वेळी त्याला सांगण्यात आले की, कदाचित एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची हत्या करावी लागू शकते.
इराणी हँडलरने त्याला तीन संभाव्य लक्ष्य सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प , जो बायडन आणि निक्की हेली. त्या काळात ट्रम्प आणि बायडन हे 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रमुख उमेदवार होते. तर निक्की हेली काही आठवड्यांपूर्वीच या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या.
advertisement
आसिफने 2022 किंवा 2023 दरम्यान इराणी गुप्तचरांसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेने इराणवर घातलेल्या आर्थिक निर्बंधांना चुकवण्यासाठी त्याने मनी लॉन्डरिंगमध्ये मदत केली. त्यानंतर इराणी हँडलरने आसिफला अमेरिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्या करण्याचा कट रचणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे चोरण्याचे काम दिले होते.
न्यायालयात आसिफ मर्चंटचे विधान
न्यूयॉर्कच्या न्यायालयात आसिफ मर्चंट म्हणाला, “माझ्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या होत्या. इराणमध्ये राहणाऱ्या माझ्या नातेवाईकांवर दबाव आणण्यात आला. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.”
advertisement
आसिफची पत्नी पाकिस्तानमध्ये त्यांच्या तीन मुलांसोबत राहते, तर त्याचे काही नातेवाईक इराणमध्ये आहेत. मर्चंटच्या म्हणण्यानुसार, इराणी हँडलर त्याच्या घराबाहेर आला होता आणि त्याने कुटुंबीयांना शस्त्रे दाखवून धमकावले. त्यामुळे त्याच्यावर या कटात सहभागी होण्याचा दबाव निर्माण करण्यात आला.
एफबीआयने जून 2024 मध्ये क्वीन्समधील एका मोटेलमध्ये लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यांमध्ये मर्चंट एका रिपब्लिकन नेत्याच्या (न्यायालयीन कागदपत्रांमध्ये ज्याला ट्रम्प असे म्हटले आहे) हत्या करण्याच्या योजनेवर चर्चा करताना दिसल्याचे सांगितले आहे. एफबीआयच्या माहितीनुसार, इराणी हँडलरने त्याला या कामासाठी 5,000 डॉलर्स अॅडव्हान्स म्हणून दिले होते.
advertisement
एका व्हिडिओमध्ये मर्चंट म्हणताना दिसतो, “हे टार्गेट आहे. हे कसे मारले जाईल?”
“मला माहिती होते की मी पकडला जाईन”
मर्चंटने ज्युरीसमोर सांगितले की त्याला आधीपासूनच वाटत होते की हा कट यशस्वी होणार नाही आणि त्याला अटक होईल.
त्याने न्यायालयात सांगितले मला 5,000 डॉलर्स मिळाले होते. इतक्या कमी पैशात कोणीही हत्या करत नाही. त्यामुळे मला वाटत होते की मला पकडले जाईल.
advertisement
मर्चंटने दावा केला की, त्याला अमेरिकन सरकारला या कटाबद्दल माहिती द्यायची होती आणि त्यासाठी ग्रीन कार्डसाठी अर्ज करायचा होता. त्याने न्यायालयात स्वतःवर ठेवण्यात आलेल्या दहशतवाद आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या आरोपांना नाकारले आणि आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
दोषी ठरल्यास होऊ शकते जन्मठेप
जर आसिफ मर्चंट दोषी ठरला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. प्रॉसिक्युशनने गुरुवारी त्याच्या उलटतपासणीची (क्रॉस-एग्जामिनेशन) तयारी केली आहे. ज्यामध्ये त्याच्या विधानांवर कठोर प्रश्न विचारले जाणार आहेत. हा खटला सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा दावा केला आहे की इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स त्यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत.
advertisement
ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीही असा दावा केला होता की इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे, इराणमध्ये सर्वोच्च नेतेच इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे प्रमुख असतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
जग घाबरले, युद्धाचा नवा अंक सुरू होणार; इराणकडून ट्रम्प यांच्या हत्येचे कॉन्ट्रॅक्ट, पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत पाठवले
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement