advertisement

Nagpur: लेकरं झाली तरी सागर पिच्छा सोडेना, सोनालीने भेटायला बोलावलं अन् बाईकवरच गळा कापला, नवऱ्यानेही केले सपासप वार

Last Updated:

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. लग्न झालं तरी मृत तरुण हा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे पती आणि पत्नीने मिळून

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर : प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून खून आणि मारहाणीच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये. पण, नागपूरमध्ये एक सिनेस्टाईल हत्येची घटना समोर आली आहे.   नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. लग्न झालं तरी मृत तरुण हा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे पती आणि पत्नीने मिळून या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर दुपारी ही घटना घडली.  सागर वानखेडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर  आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये अशी मारेकऱ्यांची नाव आहे. नागपूर पोलिसांनी  या नवरा आणि बायकोला ताब्यात घेतलं आहे.
खून का झाला? 
आरोपी सोनाली आणि मृत सागर वानखेडेचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. सागरने सोनालीसोबत लग्न करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केलं. लग्न झााल्यानंतर सोनाली आणि राजू गजभिये यांना दोन मुलं आहेत. परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. ही बाब समोर आल्यानंतर  राजू गजभिये यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण, सागर काही ऐकायला तयार नव्हता.
advertisement
सोनालीला भेटण्यासाठी बोलावलं अन् 
दरम्यान,  मृत सागर वानखेडे हा होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला. आज गुरुवारी सकाळी  १० वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली.  सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागरवर अनेक वार केले.  यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पिकअप व्हॅनमधून नेला मृतदेह
भर रस्त्यावर खून झााल्याची घटना घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी पती - पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सागरला एका पिकअप व्हॅनमध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.  या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: लेकरं झाली तरी सागर पिच्छा सोडेना, सोनालीने भेटायला बोलावलं अन् बाईकवरच गळा कापला, नवऱ्यानेही केले सपासप वार
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement