IND vs ENG : टीम इंडिया 270 पार गेली असती, पण हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे घात झाला, शेवटच्या ओव्हरला मोठा ड्रामा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हार्दिक पांड्याच्या एका चुकीमुळे मोठा घात झाला आहे.. कारण टीम इंडियाने आणखी 20-25 धावा काढू शकली असती. पण पांड्याच्या चुकीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.
India vs England 2nd Semi Final : टी20 वर्ल्डकप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाने तडाखेबाज फलंदाजी केली आहे. या फलंदाजी दरम्यान मैदानात एक मोठा ड्रामा घडला होता. त्याचं झालं असं की मैदानात हार्दिक पांड्याच्या एका चुकीमुळे मोठा घात झाला आहे.. कारण टीम इंडियाने आणखी 20-25 धावा काढू शकली असती. पण पांड्याच्या चुकीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.त्यामुळे लाईव्ह सामन्यात नेमका काय ड्रामा झाला आहे. हे जाणून घेऊयात.
खरं तर 18 व्या ओव्हरला ही घटना घडली होती. इंग्लंडचा सॅम करन यावेळी गोलंदाजी करत होता. सॅम करनने त्याचा तिसरा बॉल हा हार्दिक पांड्याला यॉर्कर टाकला होता. हा बॉल मारल्यानंतर तो दुर गेला होता. या दरम्यान हार्दिकने धावायाचा प्रयत्न केला आणि शिवम दुबेला कॉलही दिला. त्यानुसार शिवम दुबे धावत निघाला पण त्यानंतर हार्दिकने फिल्डरच्या हातात बॉल पाहून तो मध्येच थांबला. पण शिवम दुबे निम्मा क्रिज पार करून आलेला होता. आणि नंतर विकेट वाचवण्यासाठी पळताना दुबे रनआऊट झाला होता.
advertisement
शिवम दुबे ज्यावेळेस रनआऊट झाला तेव्हा तो 25 बॉलमध्ये 43 धावा करून बाद झाला होता. याचा अर्थ तो आपल्या अर्धशतकानजीक होता आणि वेगाने खेळत होता.त्यामुळे त्याच्या मदतीने भारताला आणखी धावा काढता आल्या असत्या पण हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे ते शक्य होऊ शकले नाही.
दुबे बाद झाल्यानंतर तिलक वर्माने 7 बॉल 21 धावा काढल्या होत्या. तर हार्दिक पांड्या 27 वर बाद झाला होता.त्याच्या आधी भारताकडून सर्वाधिक धावा या संजू समॅसनने ठोकल्या होत्या. संजूने 42 बॉलमध्ये 89 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 7 षटकार आणि 8 चौकार मारले होते. त्यानंतर शिवम दुबेने 43 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 253 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड समोक 254 धावांचे लक्ष्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 9:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : टीम इंडिया 270 पार गेली असती, पण हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे घात झाला, शेवटच्या ओव्हरला मोठा ड्रामा









