advertisement

Weather Alert: सावधान! महाराष्ट्रावर 'हिट वेव्ह'चं संकट, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली असून मार्चमध्येच सूर्य आग ओकत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 6 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रात मार्चमध्येच मे महिन्यासारखे उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यातील काही भागात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे ‘हिट वेव्ह’ सदृश्य स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. विशेषतः उत्तर कोकणात मराठवाडा आणि विदर्भापेक्षा जास्त ऊन जाणवत असून उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. 6 मार्च रोजी राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकणात उष्ण आणि दमट हवामानाने टेन्शन वाढवलं आहे. 6 मार्च रोजी देखील मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात तापमानाचा पारा 34 ते 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून कल्याण-डोंबिवलीत चाळीशी पार जाईल. तर आर्द्रता 42 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

3/7
उत्तर महाराष्ट्रात देखील उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. शुक्रवारी हवामान कोरडे आणि उष्ण राहील. कमाल तापमान 36-40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तापमानात 2-3 अंश सेल्सियसपर्यंत वाढ होणार असल्याने हीट स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो.

4/7
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगलीचा पारा देखील चढला आहे. या भागात कमाल तापमान 34 ते 38 अंशांपर्यंत जाईल. उन्हाची तीव्रता वाढली असली तरी विदर्भ, मराठवाड्यापेक्षा तापमान कमी आहे. रात्री थोडासा गारवा जाणवत आहे. पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यात देखील मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमान 35-38 अंशांपर्यंत वाढलं आहे. छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत ऊन घाम काढत आहे. तर रात्री पारा 18-22 अंशांपर्यंत खाली येत असल्याने काहीसा गारवा जाणवत आहे.

6/7
विदर्भात देखील उष्णतेचा पारा चांगला चढला आहे. कमाल तापमान चाळीशी पार गेलं आहे. शुक्रवारी देखील कमाल तापमान 37-41 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील विदर्भात तापमानाची चाळीशी पार होण्याची शक्यता आहे.

7/7
दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात तापमानात वाढ झाली आहे. दमट आणि उष्ण हवामानामुळे उत्तर कोकणातील 4 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेल्याने हीट स्ट्रोक आणि डीहायड्रेशनचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement