भारताचा 35 वर्षीय खेळाडू मोहम्मद शमीने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. टीम इंडियाचा या स्पर्धेत फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता.त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेत रनर अप राहिली होती. त्यानंतर मोहम्मद शमी भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा देखील खेळला होता. या स्पर्धेनंतर तो पुन्हा भारतासाठी एकदा ही खेळला नाही. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने फिटनेसच कारण देऊन त्याला संधी दिली नसल्याची माहिती आहे. पण यानंतर देखील त्याने मैदान सोडलं नाही. याउलट तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आणि त्याने 67 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
या दरम्यानच्य काळात मोहम्मद शमीच्या निवृत्तीच्या चर्चा प्रचंड रंगल्या होत्या. या चर्चावर बोलताना मोहम्मद शमीने एका वाक्यात निवृत्तीचा विषय संपवला आहे.मी तेव्हाच क्रिकेट सोडेन, ज्यावेळेस मला कंटाळा येईल,असे मोहम्मद शमी म्हणाला आहे. शुभंकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलवर शमी बोलला आहे.
मी जेव्हा खरंच थकेन, तेव्हा मी निवृत्ती घेईन. पण सध्या मी निवृत्तीचा विचार करत नाही आहे. कारण असे विचार तुम्हाला खचवतात. जर तुमच्या मनात असा विचार आला, तर याचा अर्थ तुम्ही आधीच थकला आहात. आणि जर तुम्ही थकला असाल तर याचा अर्थ तुम्हाला कंटाळा आला आहे. मी हे आधीही सांगितलेले आहे. ज्या दिवशी मला सकाळी उठल्यावर कंटाळा येईल.त्या दिवशी मी क्रिकेट सोडेने असे मोहम्मद शमी म्हणाला आहे.
हो खरंच ज्या दिवशी मला आळस किंवा कंटाळा येईल,त्या दिवशी मी सोडून देईन.पण मला कंटाळाही आलेला नाही आणि आळसही नाही. मी खेळाचा आनंद घेत आहे. आणि माझे निकालही चांगले आणि सकारात्मक असल्याचे शमी म्हणाला आहे.
दरम्यान मागच्या हंगामात मोहम्मद शमी हा सनरायझर्स हैदराबादच्या संघात होता. पण त्याचा तो हंगाम निराशाजनक ठरला होता.आता त्याला हैदराबादने करारमुक्त केले होते.त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याला लखनऊ सुपर जाएटसने ताफ्यात घेतलं आहे.त्यामुळे लखनऊ सूपर जाएटसकडून तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
