TRENDING:

IND vs NZ Final : 254 वर्षात असं कधीच झालं नाही! टी-20 वर्ल्ड कप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या बॉलरने रचला इतिहास

Last Updated:

Brett Randell takes Five wickets in five balls : फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 254 वर्षांच्या इतिहासात 5 बॉलवर सलग 5 विकेट घेणारा ब्रेट रैंडेल हा जगातील पहिला बॉलर ठरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
New Zealand bowler Brett Randell Create history : क्रिकेटच्या इतिहासातील आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच त्याआधी न्यूझीलंडच्या एका बॉलरने इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेकदा हॅट्ट्रिक पाहतो, पण एकामागून एक 5 बॉलवर 5 विकेट घेण्याचा पराक्रम क्वचितच पाहायला मिळतो. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4 बॉलवर 4 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे, पण आता न्यूझीलंडच्या एका बॉलरने त्याही पलीकडे जाऊन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
New Zealand bowler Brett Randell takes Five wickets in five balls
New Zealand bowler Brett Randell takes Five wickets in five balls
advertisement

5 बॉलवर सलग 5 विकेट

फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 254 वर्षांच्या इतिहासात 5 बॉलवर सलग 5 विकेट घेणारा ब्रेट रैंडेल हा जगातील पहिला बॉलर ठरला आहे. ब्रेट रैंडेलने हा ऐतिहासिक पराक्रम 'सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स' कडून खेळताना रविवारी नेपियरमध्ये केला. प्लंकेट शील्ड मॅचच्या दुसऱ्या दिवशी 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स' विरुद्ध बॉलिंग करताना त्याने प्रतिस्पर्धी टीमचे कंबरडे मोडले. रैंडेलने या स्पेलमध्ये केवळ 25 रन्स देऊन 7 विकेट घेतल्या.

advertisement

संघ अवघ्या 82 रन्सवर ऑल आऊट

ब्रेट रैंडेल याच्या या भेदक माऱ्यामुळे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा संपूर्ण संघ अवघ्या 82 रन्सवर ऑल आऊट झाला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 बॉलवर 5 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू असला, तरी यापूर्वी इतर फॉरमॅटमध्ये अशा कामगिरीची नोंद झाली आहे. मात्र, आयसीसीच्या नियमानंतर आता 254 वर्षानंतर इतिहास रचला गेला आहे.

advertisement

डोमेस्टिक टी-20 मॅचमध्ये पराक्रम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशक्य काहीच नाही! लहानपणी क्रिकेटची आवड, तिनं लग्नानंतर केलं असं, घरात 100 ट्रॉफ
सर्व पहा

दरम्यान, आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने गेल्या वर्षी एका डोमेस्टिक टी-20 मॅचमध्ये असा पराक्रम केला होता. तसेच झिम्बाब्वेच्या केलिस नधलोवूने 2024 मध्ये अंडर-19 डोमेस्टिक टी-20 मॅचमध्ये 5 बॉलवर 5 विकेट घेतल्या होत्या. मात्र, रेड बॉल क्रिकेटमध्ये (फर्स्ट क्लास) असा पराक्रम करणारा रैंडेल हा एकमेव आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : 254 वर्षात असं कधीच झालं नाही! टी-20 वर्ल्ड कप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या बॉलरने रचला इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल