काय म्हणाला नितीश कुमार रेड्डी?
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मी चांगली बॅटिंग तर केली पण बॉलिंगवर काम करण्याची गरज आहे, असं मला जाणवलं. त्यानंतर मी माझा कॅप्टन (SRH साठी) राहिलेल्या पॅट कमिन्ससोबत चर्चा केली. ऑस्ट्रेलियाच्या पीचवर मी काय सुधारणा करु शकतो, यावर मी त्याला विचारणा केली. त्यानंतर पॅट कमिन्सने मला काही सल्ला दिले. त्याचा मला फायदा झाला. माझी बॉलिंग सुधारली, असं देखील नितीश कुमार रेड्डी याने म्हटलं आहे.
advertisement
आम्ही बॉलिंगवर काम करतोय - नितीश रेड्डी
नितीश कुमार रेड्डी याने यावेळी टीम इंडियाच्या बॉलिंग कोचचे देखील आभार मानले. इंग्लंड दौऱ्याआधी मॉर्ने मॉर्कल याने दिलेल्या टीप्स कामी आल्या. इथं आल्यापासून आम्ही बॉलिंगवर काम करत आहोत. त्याचा फायदा मला विकेट्स घेण्यात आला, असंही नितीश कुमार रेड्डी याने म्हटलं आहे.
23 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं
तब्बल 23 वर्षात दुसऱ्यांदा एखाद्या भारतीय वेगवान बॉलरने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये दोन किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2006 मध्ये इरफान पठाणने कराची येथे पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता. इरफानने दोन नव्हे तर हॅट्रिक पूर्ण केली होती. यावेळी नितीश कुमार रेड्डी यांनी 2 विकेट्स नावावर केल्या आहेत.
कसोटीमधील कामगिरी
दरम्यान, नितीश कुमार रेड्डीने 22 नोव्हेंबर 2024 रोजी पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. जुलै 2025 पर्यंत, त्याने 6 कसोटी मॅच खेळल्या आहेत. यामधील आत्तापर्यंतची त्याची सर्वोत्तम कामगिरी ही लॉर्ड्सवर चालु असलेल्या सामन्यात आहे. त्यामुळे आता ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डी याला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल.