नीतीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात वाद
शुक्रवारी संध्याकाळी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात घडली. या मॅचमध्ये नीतीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर नीतीश राणा याने पोस्ट केली. त्यामुळे ही पोस्ट दिग्वेश राठी याच्यासाठी होती, असं काहीजण म्हतायेत. तर ही पोस्ट टीकाकारांसाठी होती, असं काहीजण म्हणतायेत. नीतीश राणाने नुकतंच एका जुळ्या पोरांना जन्म दिला आहे आणि तो बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा याचा जावई देखील आहे.
advertisement
मॅचमध्ये नेमकं काय झालं होतं?
या सामन्यात राणा आणि राठी यांच्यात वाद झाला. राठीने गोलंदाजीच्या वेळी चेंडू टाकलाच नाही आणि पुन्हा चेंडू टाकण्यासाठी गेला. त्यावेळी राणा स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर राठी परत गोलंदाजीसाठी आले तेव्हा राणा मागे हटला. यानंतर राणाने राठीच्या पुढच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळून डीप पॉइंटच्या वरून षटकार ठोकला. त्यामुळे वातावरण थोडे तंग झाले. त्यानंतर राणा रागाने राठीकडे धावत जाताना दिसला. अंपायर गायत्री वेणुगोपालन आणि जवळच्या क्षेत्ररक्षकांनी लगेच हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले.
दरम्यान, नितीशच्या या पोस्टवर अनेक क्रिकेटपटूंनी कमेंट्स केल्या. विशेष म्हणजे, यात त्याच्या KKR च्या जुन्या सहकाऱ्यांची संख्या जास्त होती. आयपीएल 2024 मध्ये KKR ला विजेतेपद मिळवून देणाऱ्या टीममधील रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क आणि आंद्रे रसेल यांच्यासह अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. रिंकू सिंगने 'ये तो चीते की चाल है!' असे लिहित कमेंट केली. वरुण चक्रवर्तीने 'राजा आहेस तू' असे म्हणत स्तुती केली.