नितीश कुमार रेड्डी संतापला
हैदराबादचे आघाडीचे फलंदाज अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांना विशेष कामगिरी करता आली नाही. परंतु, ट्रॅव्हिस हेडने 47 धावा केल्या. रवी बिश्नोईने त्याला बाद केले, त्यानंतर नितीश कुमार रेड्डीकडे नाव कमवण्याची मोठी संधी होती. रेड्डीने संघाचा डाव सावरला. मात्र, तोही काही वेळात बाद झाला, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना रेड्डी संतापलेला दिसला आणि त्याने हेल्मेट पायऱ्यांवर आदळलं. आपल्याला चांगली सुरूवात मिळून देखील मोठी खेळी करता आली नाही, याची खंत त्याला होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
advertisement
नितीश रेड्डीला कांगारूंची हवा
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना राग आल्यावर आदळ आपट करण्याची सवय आहे. अनेकदा ड्रेसिंग रुममधील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता सनरायझर्स हैदराबादमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हवा नितीश कुमार रेड्डीला लागली की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव.