TRENDING:

PAK vs SL : श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूमबाहेर राडा! लसिथ मलिंगा अन् कॅप्टन शनाकामध्ये बाचाबाची, पाहा LIVE मॅचमध्ये काय घडलं?

Last Updated:

Lasith Malinga Angry On Dasun shanaka : शनाकाने एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात त्याला यश आलं नाही. मलिंगा यांना शनाकाची ही चूक अजिबात आवडली नाही

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistan vs Sri lanka : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधून पाकिस्तानचा पत्ता कट झाला असून आता पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. सुपर 8 च्या शेवटून दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला खरा पण श्रीलंकेने पाकिस्तानचा गेम केला आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या मार्जिनने विजयाची गरज होती. मात्र, श्रीलंकेचा कॅप्टन दसुन शनाका याने अफलातून खेळी केली अन् पाकिस्तानला बॅगा पॅक करण्यास भाग पाडलं आहे. अशातच आता मॅच संपल्यानंतर श्रीलंकेच्या हिरोला कोच लसिथ मलिंगा याने झाप झाप झापल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे मोठा वाद झाला होता.
PAK vs SL Lasith Malinga Angry On Dasun shanaka
PAK vs SL Lasith Malinga Angry On Dasun shanaka
advertisement

लसित मलिंगा चांगलाच भडकला

मॅच संपल्यानंतर जेव्हा दासुन शनाका ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, तेव्हा त्याला बॉलिंग कोच लसित मलिंगा यांच्या रागाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शनाकाने एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात त्याला यश आलं नाही. मलिंगा यांना शनाकाची ही चूक अजिबात आवडली नाही आणि त्यांनी मैदानातून परतलेल्या शनाकाला चांगलंच सुनावलं. तुला कव्हर्सच्या दिनेशे मारायला येत नाही का? असा सवाल त्याने त्याला विचारला असावा.

advertisement

पाकिस्तानला रडकुंडीला आणलं

शनाकाने अखेरच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारत पाकिस्तानला रडकुंडीला आणलं होतं. शनाकाने पाकिस्तानच्या प्रिमियम फास्ट बॉलरची धुलाई केली. पण अखेरचे दोन बॉल तो हुकला. मलिंगा ओरडत असताना शनाकाने सुरुवातीला आपली बाजू मांडण्याचा किंवा सफाई देण्याचा प्रयत्न केला, मात्र मलिंगा यांचा पारा चढलेलाच होता. अखेर मलिंगा यांचा रुद्रावतार पाहून शनाकाने तिथून माघार घेणेच पसंत केलं.

advertisement

advertisement

नाबाद 72 रन्सची तुफानी खेळी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

दरम्यान, दासुन शनाकाने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. त्यानं अवघ्या 31 बॉल्सचा सामना करताना नाबाद 72 रन्सची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत त्याने 2 फोर आणि तब्बल 8 सिक्स मारले. ज्या वेळी तो मैदानात आला, तेव्हा श्रीलंकेचा स्कोअर 5 विकेट्सवर 101 रन्स असा संकटात होता, तिथून त्याने टीमला सावरलं आणि सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. पण अखेरच्या दोन बॉलमध्ये जेव्हा 6 धावांची गरज होती, त्यावेळी त्याच्याकडून दोन चुका झाल्या, ज्यामुळे श्रीलंकेला सामना गमवावा लागला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs SL : श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूमबाहेर राडा! लसिथ मलिंगा अन् कॅप्टन शनाकामध्ये बाचाबाची, पाहा LIVE मॅचमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल