स्मृतीचे सगळे फोटो डिलिट
रविवारी सकाळी चाहत्यांच्या लक्षात आलं की, पलाश मुच्छलच्या अकाउंटवरून स्मृती मानधनाशी संबंधित एकही आठवण आता उरलेली नाही. पलाशने स्मृतीचे सगळे फोटो डिलिट केले. यापूर्वी त्यांच्या नात्यातील गोड क्षण, एकमेकांच्या वाढदिवसाच्या पोस्ट आणि फिरण्याचे फोटो पलाशच्या इन्स्ट्राग्रामवर झळकत होते. विशेष म्हणजे या दोघांनी नुकतीच आपल्या नात्याची 5 वर्षे पूर्ण केली होती, तरीही पलाशने घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण स्मृतीचा एक व्हिडीओ पलाश डिलिट करू शकला नाही.
advertisement
एक व्हिडीओ तसाच ठेवला
पलाशने एका रात्रीत स्मृतीच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या. पण एक व्हिडीओ त्याने तसाच ठेवलाय. त्यात पलाश त्याच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसतोय. त्यामध्ये स्मृती त्याच्या बाजूला उभा राहिलेला दिसतीय. तसेच अनेक स्टार कलाकार देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. पलाशने केक कापल्यानंतर पहिला घास स्मृतीला भरवला होता. त्यानंतर त्याची आई आणि बहिण देखील यात दिसत आहे. या व्हिडीओला 1.4 मिलियन लाईक आले आहेत.
कमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो
दरम्यान, पलाशने केवळ फोटोच डिलीट केले नाहीत, तर या दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो देखील केले आहे. आजच्या डिजिटल जगात 'अनफॉलो' करणं आणि 'फोटो हटवणं' हा नातं संपुष्टात आल्याचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. या धक्कादायक बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या अफवांना आता जणू अधिकृत दुजोराच मिळत असल्याचं बोललं जात आहे.
