दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं
स्मृतीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सेलिब्रेशन दरम्यान संबंधित पलाशला एका दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आलं. हा सर्व प्रकार इतका गंभीर होता की, तिथं उपस्थित असलेल्या भारतीय महिला क्रिकेटर्सनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. मैत्रिणीने या प्रसंगाचे वर्णन 'भयानक सीन' असं केलं असून, हा विवाह सोहळा त्याच ठिकाणी थांबवण्यात आला आणि संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पलाशने यावर उत्तर दिलंय.
advertisement
इंस्टाग्राम स्टोरी नेमकं काय लिहिलंय?
सांगलीतील एका 40 लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात पलाशचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर पलाशने अखेर मौन सोडले असून, त्याने आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. पलाशने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना हे आरोप पूर्णपणे चुकीचं असल्याचे म्हटलं आहे. पलाशने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी नेमकं काय लिहिलंय? पाहा
सर्व आरोप पूर्णपणे निराधार - पलाश
पलाशने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, "सांगलीतील विज्ञान माने याने सोशल मीडियावर माझ्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आहेत." त्याने या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, त्याची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे सर्व केले जात आहे. पलाशने या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचे संकेत दिले असून, आपण गप्प बसणार नाही असेही त्याने ठणकावून सांगितले आहे.
कोणतेही ठोस पुरावे नाहीत - वकील
दुसरीकडे, पलाशचे वकील श्रेयंश मिथारे यांनी या तक्रारीच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पलाश आणि स्मृतीचे लग्न मोडल्यानंतरच हे आरोप का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, पैशांच्या व्यवहाराचे कोणतेही ठोस पुरावे तक्रारदाराकडे नसल्याचा दावा वकिलांनी केला आहे. "आम्ही या व्यक्तीला ओळखत नाही आणि आमचा त्याच्याशी थेट संबंध नाही," असेही पलाशच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
