2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचं पिस्तूल तुटलं, त्यामुळे तिला 20 मिनिटे सामना खेळताच आला नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला फक्त 14 शॉट्सच मारता आले होते, यामुळे मनू अंतिम शर्यतीतून बाहेर पडली. टोकियो ऑलिम्पिकमधल्या या कामगिरीने मनू निराश झाली होती, पण यंदा तिने मागच्या कामगिरीची व्याजासह परतफेड केली आहे.
मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. दक्षिण कोरियाची ओ ये जिन पहिल्या क्रमांकावर तर दक्षिण कोरियाचीच ही किम येजी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, त्यामुळे 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात गोल्ड आणि सिल्व्हर मेडल दक्षिण कोरियाला मिळालं आहे. तर मनू 221.7 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
advertisement
मनू भाकरचा जन्म हरियाणाच्या झज्जर जिल्ह्याच्या गोरिया गावात झाला. मनूचे वडील राम किशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनिअर पदावर आहेत. 14 वर्षांपर्यंत मनू भाकरने मणिपुरी मार्शल आर्ट, बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. या खेळांमध्ये नॅशनल गेम्समध्येही तिला मेडल मिळाली होती.
मनूने 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं, तेही फक्त वयाच्या 16व्या वर्षी. तर 2022 च्या एशियन गेम्समध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये मनूने इशा सिंग आणि रिदम सांगवानसोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं.