Naman Dhir Century : आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला अजून खूप अवकाश आहे.तत्पुर्वी नुकताच आयपीएलचा लिलाव पार पडला आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी देऊन संघात घेतलेल्या खेळाडूने पैसा वसूल खेळी केली आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबई इंडियन्सचा खेळाडू नमन धीर आहे. नमन धीर सध्या पंजाब संघाकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळतो आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने 97 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीने पंजाब संघाने महाराष्ट्राचा पराभव केला आहे.
खरं तर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 347 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा संघ 50 ओव्हरमध्ये फक्त 8 विकेट गमावून 296 धावा करू शकला होता. मुंबईकडून रामाकृष्णा घोषने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली होती. त्या व्यतिरीक्त कोणत्याच खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे पंजाबने महाराष्ट्राचा 51 धावांनी पराभव केला होता. पंजाबकडून सुखदीप बाजवा आणि क्रिश भगतने प्रत्येकी 2 विकेट तर अभिषेक शर्मा आणि रघू शर्माने प्रत्येकी 1 विकेट काढली होती.
दरम्यान पंजाबकडून नमन धीरने 78 बॉलमध्ये 97 धावांची वादळी खेळी केली होती. त्याचसोबत अनमोलप्रित सिंहने 78 बॉल 85 धावांची खेळी केली होती. त्याचसोबत प्रभासिमरनने 60 धावांची वादळी खेळी केली होती. या बळावर पंजाबने 6 विकेट गमावून 347 धावा केल्या आहेत.
नमन धीर हा मुंबईचा खेळाडू आहे. मुंबईने त्याला आयपीएल 2026 च्या हंगामात 5.25 कोटी रूपयाच्या किंमतीत संघात घेतलं आहे. त्यामुळे सध्याची नमन धीरची ही कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सचा पैसा वसूल झाला आहे.
महाराष्ट्राचा संघ :
पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी,सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक (विकेटकिपर), रामकृष्ण घोष, जलज सक्सेना, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, प्रदीप दाधे
पंजाबचा संघ :
प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), अभिषेक शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, सलील अरोरा, नमन धीर, रमणदीप सिंग, क्रिश भगत, हरप्रीत ब्रार,सुखदीप बाजवा, गुरनूर ब्रार, रघु शर्मा
