TRENDING:

शिवम दुबेचा ट्रेनने प्रवास, पण अश्विन अण्णा भयंकर चिडला,भर मुलाखतीत सुनावलं

Last Updated:

टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज आर. अश्विन चिडला आहे आणि त्याने मुलाखतीत दुबेला सुनावलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
R Ashwin on Shivam Dube : टीम इंडियाच्या टी20 वर्ल्डकप विजयाला दोन आठवड्याला कालावधी उलटला असताना देखील एका खेळाडूची प्रचंड चर्चा रंगली आहे. हा खेळाडू म्हणजे शिवम दुबे आहे. शिवम दुबे चर्चेत येण्यामागचं खरं कारण म्हणजे त्याने वर्ल्ड कप विजयानंतर ट्रेनेच्या थर्ड एसीच्या बोगीमधून मुंबई गाठलं होतं. या दरम्यान टीसी देखील आला त्याने दुबेच्या नावाचा उल्लेख केला पण बायकोने हा तो शिवम दुबे नसल्याचा सांगत विषय टोलवला होता. आतापर्यंत सगळ्यात भारतीयांनी ही स्टोरी माहिती झाली आहे. पण याच स्टोरीवर टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज आर. अश्विन चिडला आहे आणि त्याने मुलाखतीत दुबेला सुनावलं आहे.
R ashwin on shivam dube
R ashwin on shivam dube
advertisement

दरम्यान शिवम दुबे पहिल्यांदा वर्ल्डकप विजयानंतर मुंबईत येताना कसा आला? याची माहिती दिली आहे.वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला घरी जायची घाई झाली होती. घरी जाऊन मला मुलं आणि वडिलांना भेटायचं होतं, त्यामुळे मी सकाळीच घरासाठी रवाना झालो. कधी एकदा घरी पोहोचतोय, असं मला झालं, असं शिवम दुबे म्हणाला आहे.

मी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी फ्लाईट तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, पण अहमदाबादवरून मुंबईला जाणारी सगळी फ्लाईट फूल होती, त्यामुळे मी ट्रेनने जायचा निर्णय घेतला. मी कारनेही मुंबईला पोहोचू शकलो असतो, पण ट्रेन जास्त लवकर पोहोचते म्हणून मी ट्रेनने निघालो, असं वक्तव्य दुबेने केलं आहे.

advertisement

शिवम दुबे त्याची पत्नी आणि एका मित्रासह थ्री टियर एसी कोचमधून ट्रेनने मुंबईमध्ये आला.शिवम दुबेच्या या निर्णयामुळे त्याचं कुटुंब आणि मित्रही थोडे चिंतेत होते.स्टेशन किंवा ट्रेनवर कुणी ओळखलं तर काय होईल? अशी भीती शिवम दुबेच्या कुटुंबाला वाटत होती.

चाहत्यांच्या गर्दीपासून वाचण्यासाठी शिवम दुबेने कॅप, मास्क आणि फूल स्लीव्हचा टी-शर्ट घातला होता, त्यामुळे त्याला कुणीच ओळखू शकलं नाही. अहमदाबादवरून दुबेने पहाटे 5.10 ची ट्रेन पकडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी असेल. ट्रेन सुटायच्या 5 मिनीट आधीपर्यंत मी कारमध्ये बसलो होतो आणि पटकन ट्रेनमध्ये चढलो, असं दुबेने सांगितलं आहे.

advertisement

दरम्यान मागच्या अनेक दिवसांपासून शिवम दुबेच्या या स्टोरीची प्रचंड चर्चा आहे.असे असताना यावर टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज शिवम दुबेने संताप व्यक्त केला आहे. शिवम दुबेने ट्रेनने प्रवास केल्याच्या बातम्या मी पाहत आहे.मला तशा बातम्या वाचायच्या नाहीत. त्यात एवढं काय विशेष आहे? मी स्वतः ट्रेनने प्रवास केला आहे, अशा शब्दात त्याने दुबेला सुनावलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

तसेच मला खूप आवडेल की, आपल्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना चहावाल्यांकडे जाऊन लोकांसोबत चहा पिता यावा. खरं तर, आपण हेच विसरलो आहोत की आयुष्यातील आनंद हा खूप छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो, असे अश्विन म्हणाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शिवम दुबेचा ट्रेनने प्रवास, पण अश्विन अण्णा भयंकर चिडला,भर मुलाखतीत सुनावलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल