हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अभिमन्यू ईश्वरन आहे.रणजी ट्ऱॉफीच्या सामन्या दरम्यान पाणी पिण्याच्या नादात अभिमन्यू ईश्वरन विकेट गमावून बसला होता. त्याचं झालं असं की बंगाल आणि सर्विसेस यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात अभिमन्यू ईश्वरन 81 धावांवर खेळत होता. ज्याप्रमाणे तो मैदानात पाय रोवून उभा होता, ते पाहता तो शतक ठोकले असे नक्कीच वाटत होते. पण सामन्यात पुढे मोठा ट्वि्स्ट आला.
advertisement
सर्विसेसकडून आदित्य कुमार 41 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता.यावेळी आदित्य कुमारने एक फुल लेंथ बॉल टाकला. ज्यामध्ये सुदीपने आदित्य कुमारच्या दिशेने बॉल मारला. यानंतर नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या अभिमन्यू ईश्वरनला वाटलं की ओव्हर संपली आहे आणि अंपायरने ओव्हरची समाप्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अभिमन्यू ईश्वरन नॉन स्ट्राईक एंडवरून क्रिज बाहेर निघाला. तेव्हाच आदित्यचा हाताला बॉल लागून थेट स्टम्पवर आदळला होता.त्यामुळे अभिमन्यूला क्रिजबाहेर पाहून फिल्डींदग टीमने रनआऊटचे अपिल केले. पण मैदानातील अंपायरला देखील ही गोष्ट कळाली नाही.त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरसाठी अपिल केले.
थर्ड अंपायरने दाखवलेल्या रिव्ह्यूमध्ये आदित्य कुमारच्या बोटांना बॉल लागून तो थेट स्टम्पवर आदळला होता. या दरम्यान अभिमन्यू क्रिजबाहेर होता. त्यामुळे रनआऊट देण्यात आले.अशाप्रकारे अभिमन्यू ईश्वरनच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 28वं शतक हुकलं.
दरम्यान 2022ला बांगलादेशची टीम दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आली होती. तेव्हा रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने अभिमन्यू ईश्वरनला भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्यानंतर तो अनेकदा टीम इंडियाच्या संघात होता. पण त्याला खेळायची संधी मिळाली नाही. अभिमन्यून 109 फर्स्ट क्लास सामन्यात 8 हजार 136 धावा केल्या आहेत आणि आजही तो भारताकडून डेब्यू करण्याची संधी शोधतो आहे.
