खरं तर पंजाबने दुसऱ्या डावात कर्नाटक समोर 252 धावांच लक्ष्य ठेवलं होतं.हे लक्ष्य गाठून कर्नाटक सामना जिंकेल असे वाटले देखील नव्हते.पण शेवटी कर्नाटकने करून दाखवले आहे. कर्नाटककडून केएल राहुल आणि कर्णधार देवदत्त पडीकल फलंदाजीसाठी आला होता. यावेळी राहुल 13 वर बाद झाला.त्यानंतर मयंक अगरवाल मैदानात आला होता.यावेळी मयंक आणि पडीकलने डाव सावरला.नंतर पुढे जाऊन मयंक अगरवाल 53 धावांची अर्धशतकीय खेळी करून बाद झाला.
advertisement
मयंक बाद झाल्यानंतर अनीश आणि रविचंद्रन झटपट आऊट झाले.त्यामुळे कर्नाटक सामना गमावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण कर्णधार पडीकलने डाव सावरून श्रेयस गोपालच्या मदतीने 27.5 ओलव्हरमध्ये हा सामना जिंकून दिला. या सामन्यात देवदत्त पडीकलने 85 बॉलमध्ये 120 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लावले होते. त्याच्यासोबत गोपालने 33 धावांची खेळी केली.या खेळीच्या बळावर कर्नाटकने सामना जिंकला. यातला देवदत्त पडीकल मागच्या अनेक सामन्यापासून शतकीय खेळी करून टीम इंडियाचे दार ठोठावतो आहे, पण गंभीर त्याची निवडच करत नाही आहे.त्यामुळे तो दुर्लक्षित राहिलेला आहे.
आता या विजयासह कर्नाटकने गट ब मध्ये आपला प्रवास शानदारपणे संपवला. संघाने एकूण 27 गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवली. मध्य प्रदेशने गटात अव्वल स्थान पटकावले, तर कर्नाटकने दमदार कामगिरीसह अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. आता उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकसमोर आणखी मोठे आव्हान आहे.
