पत्रकार रवीश बिश्त यांच्याशी यूट्यूब चॅनेलवर बोलताना मॉटी पानेसर यांनी, इंग्लंडला अशा प्रशिक्षकाची आवश्यकता आहे जो ऑस्ट्रेलियाला त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीत, रणनीतिक आणि मानसिकदृष्ट्या कसे हरवायचे हे समजतो. "तुम्हाला विचार करावा लागेल,ऑस्ट्रेलियाला कसे हरवायचे हे नेमके कोणाला माहित आहे?, ऑस्ट्रेलियाच्या मानसिक, शारीरिक आणि रणनीतिकदृष्ट्या कमकुवतपणाचा तुम्ही कसा फायदा घेता? मला वाटते की रवी शास्त्री इंग्लंडचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनले पाहिजेत,असे रवि शास्त्री म्हणाले आहेत.
advertisement
पानेसर यांचे प्रकरण पूर्णपणे शास्त्रींच्या रेकॉर्डवर अवलंबून आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका जिंकल्या.पहिली 2018/19 मध्ये भारताने तिथे पहिली मालिका जिंकली आणि पुन्हा 2020/21 मध्ये नंतरचा विजय विशेषतः उल्लेखनीय होता.
खरं तर मे 2022ला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रॅडन मॅक्युलमने टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर तो पुढे जाऊन टी20 आणि वनडेचाही कर्णधार बनला. मॅक्युलमची नियुक्ती बोर्डाने त्यावेळी केली होती, ज्यावेळी इंग्लंड अॅशेस मालिका 4-0ने हारली होती. मॅक्युलम आणि कॅप्टन बेन स्टोक्सच्य जोडीने इंग्लंड संघाचे विचार बदलले आणि सूरूवातीच्या 11 पैकी 10 सामने जिंकले होते.त्यानंतर इंग्लंडची कामगिरी स्थिर राहिली.मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पाच सामन्यांची कोणतीही मोठी मालिका जिंकू शकला नाही. मॅक्युलमच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या वादविवादाच्या दरम्यान इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज मॉटी पानेसर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.इंग्लंडचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून मॅक्युलमची जागा रवी शास्त्रींनी घ्यावी,असे मॉटी पानेसर यांनी म्हटले आहे.
दरम्यान आता अॅशेस मालिकेत आता पुढच्या दोन सामन्यांचा निकाल काय लागतो. आणि या निकालानंतर मॅक्युलमची विकेट पडणार आहे. आणि विशेष म्हणजे रवी शास्त्रीची इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
