TRENDING:

Ravindra Jadeja : ट्रॉफी जिंकून दिली त्याच CSK विरुद्ध खेळताना जडेजा भावुक, डोळ्यात पाणी अन्... पाहा Video

Last Updated:

Ravindra Jadeja Emotional While Playing Against CSK : चेन्नई सुपर किंग्जला चार आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रविंद्र जडेजा राजस्थानकडून खेळताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ravindra Jadeja Emotional Video : कालच्या चेन्नई विरुद्ध राजस्थान मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना रवींद्र जडेजाने आपल्या जुन्या टीमविरुद्ध, म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) जबरदस्त प्रदर्शन केलं. जड्डूने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन स्टार बॅटर्सला माघारी पाठवलं अन् चेन्नईला मॅचमधून बॅकफूटवर पाठवलं. जडेजाचा तीन ओव्हरचा स्पेल राजस्थानसाठी गेमचेंजर ठरला. अशातच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना रविंद्र जडेजा भावूक झाल्याचं पहायला मिळालंय.
Ravindra Jadeja Emotional While Playing Against CSK
Ravindra Jadeja Emotional While Playing Against CSK
advertisement

पिंक कलर माझ्यावर छान दिसतोय - जडेजा

तब्ब्ल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या पिंक जर्सीत मैदानात उतरलेल्या जडेजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. जेव्हा पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये जडेजाला त्याच्या भावना विचारल्या, तेव्हा "मला वाटतं, हा पिंक कलर माझ्यावर छान दिसतोय," असं म्हणत जड्डूने पुनरागमनाचा आनंद व्यक्त केला. जडेजाने याच मॅचमध्ये एकाच टीमसाठी दोन मॅचेसमध्ये सर्वाधिक दिवसांचे अंतर (6157 दिवस) असण्याचा अनोखा आयपीएल रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे.

advertisement

CSK vs RR : पावरप्ले नाही तर 8 च्या ओव्हरमध्ये CSK च्या हातातून निसटली मॅच, पहिल्या 20 मिनिटात चेन्नईचा गेम!

जडेजाच्या डोळ्यात पाणी

मात्र, मॅचमध्ये रविंद्र जडेजा भावूक झाल्याचं दिसून आलं. पहिली ओव्हर टाकल्यानंतर जडेजा आनंदी होता. पण त्यानंतर बॉन्ड्रीवर फिल्डिंगला गेल्यावर तो भावूक झाला. त्याचा चेहरा पडलेला दिसला तसेच त्याच्या डोळ्यात पाणी होतं, असं चाहत्यांचं म्हणण आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

पाहा Video

माझ्यासाठी एक भावुक क्षण - रविंद्र जडेजा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सुरुवातीला हे थोडे कठीण होते, कारण मी CSK कडून जवळपास 12-13 वर्षे खेळलो होतो; त्यामुळे साहजिकच तो एक भावुक क्षण होता. पण त्यानंतर मी विचार केला की, हा देखील माझ्या प्रवासाचाच एक भाग आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे, ज्या संघासोबत मी माझे पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होतं, त्याच संघात मी पुन्हा परत जात आहे, असं जडेजा मॅचनंतर म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra Jadeja : ट्रॉफी जिंकून दिली त्याच CSK विरुद्ध खेळताना जडेजा भावुक, डोळ्यात पाणी अन्... पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल