TRENDING:

WPL Final च्या शेवटच्या बॉलवर ड्रामा! राधा यादव खरंच हिटविकेट झाली का? 90 डिग्रीच्या कॅमेऱ्यातून Video आला समोर

Last Updated:

Radha yadav hit wicket confusion : राधा यादव हिट विकेट झाली असं वाटल्यानं मैदानात गोंधळ उडाला, पण आरसीबीच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरू केलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WPL Final Last Ball Drama : विमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या रोमहर्षक फायनल मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. राधा यादवने 20 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर फोर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला, मात्र याच बॉलवर ती 'हिट विकेट' झाल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. राधाला आऊट का देण्यात आलं नाही? असा सवाल विचारला जाऊ लागला होता.
Radha yadav hit wicket confusion
Radha yadav hit wicket confusion
advertisement

शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीचरणी बॉलिंगला आली अन्...

आरसीबीला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रन्सची गरज असताना दिल्लीकडून श्रीचरणी बॉलिंगला आली. पहिल्या दोन बॉल्सवर प्रत्येकी एक धाव आली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर राधाने शानदार फोर मारला. आता विजयासाठी 3 बॉल्समध्ये 4 रन्स हवे असताना राधाने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शॉट खेळला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला, पण त्याच वेळी स्टंपची बेल्स खाली पडली.

advertisement

राधा यादव हिट विकेट झाली?

राधा यादव हिट विकेट झाली असे वाटल्याने मैदानात गोंधळ उडाला, पण आरसीबीच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरू केलं होतं. डगआउटमध्ये असलेल्या कॅप्टन स्मृती मंधानाने देखील नेमकं काय झालं, असा प्रश्न हाताने खूण करून विचारला. अखेर रिप्लेमध्ये स्पष्ट झालं की, राधाचा पाय स्टंपला लागला नव्हता, तर दिल्लीची विकेटकीपर लिजेल ली हिचे ग्लव्हज लागल्यामुळे बेल्स खाली पडली होती.

advertisement

दुसऱ्यांदा WPL ट्रॉफी जिंकली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

दरम्यान रिप्लेनंतर पंचांनी तो फोर कायम ठेवला आणि आरसीबीने सेलिब्रेशन सुरू केलं. दुसऱ्यांदा WPL ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयात कॅप्टन स्मृती मंधाना हिने 87 रन्सची वादळी खेळी करून पाया रचला होता. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पराभव धक्कादायक ठरला, कारण सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचूनही त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL Final च्या शेवटच्या बॉलवर ड्रामा! राधा यादव खरंच हिटविकेट झाली का? 90 डिग्रीच्या कॅमेऱ्यातून Video आला समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल