रोहित शर्माने 30 एप्रिलला त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला. रोहितच्या वाढदिवसाला त्याच्या कुटुंबातील एक सदस्य अचानक चर्चेत आला आहे. रोहितच्या कुटुंबातील ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणीही नसून त्याचा भाऊ विशाल आहे. रोहितचा भाऊ विशाल हा कायमच प्रकाशझोतापासून लांब असतो. सोशल मीडियावरही विशाल फार ऍक्टिव्ह नसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार विशाल रोहित शर्माचा बिजनेस सांभाळतो.
advertisement
रोहितच्या ऍकेडमीचं काम पाहतो विशाल
रोहित शर्माचा भाऊ विशाल शर्मा हा कायमच मीडियापासून दूर राहतो. व्यवसायाने विशाल बिजनेस डेव्हलपमेंटचं काम पाहतो. यासोबतच विशाल रोहित शर्माची क्रिकेट ऍकेडमी क्रिकिंगडमचं कामही बघतो. रोहित शर्मानेच या क्रिकेट ऍकेडमीची सुरूवात केली होती, पण या ऍकेडमीचं संपूर्ण काम पाहण्याची जबाबदारी विशालवर आहे. रोहित शर्माची क्रिकिंगडम नावाची ऍकेडमी भारतातल्या वेगवेगळ्या शहरांसोबतच परदेशामध्येही आहे.
काहीच दिवसांपूर्वी विशालने इंडोनेशियामध्ये क्रिकिंगडम ऍकेडमीची सुरूवात केली. इंडोनेशियामध्ये सुरू केलेल्या या ऍकेडमीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय विशाल रोहित शर्माचे मुंबईमधील वेगवेगळ्या बिजनेसही सांभाळतो.