माझ्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा - रोहित शर्मा
रोहितच्या या विधानामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तो पुढचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. रोहितने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटलं की, "मला माझ्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मी लहानपणापासून 50 ओव्हरचा वर्ल्ड कप पाहत मोठा झालो आहे. त्या काळात टी20 वर्ल्ड कप, आयपीएल किंवा डब्लूटीसी सारखे प्रकार अस्तित्वात नव्हते."
advertisement
मला ती ट्रॉफी खरंच हवी आहे - रोहित शर्मा
वर्ल्ड कप ट्रॉफीबद्दलची आपली ओढ व्यक्त करताना रोहित म्हणाला की, "त्या एका ट्रॉफीसाठी प्रचंड प्रतिक्षा आणि उत्सुकता असायची. मला ती ट्रॉफी खरंच हवी आहे." ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी रोहितने दर्शवली. 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर रोहितचे हे पहिलंच मोठं विधान आहे. त्यामुळे आता हिटमॅनचे फॅन्स देखील आनंद व्यक्त करतायेत.
रोहित 2027 मध्ये 40 वर्षांचा
दरम्यान, रोहित शर्मा सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक महत्त्वाच्या मॅचेस जिंकल्या आहेत. वयाचा विचार करता रोहित 2027 मध्ये 40 वर्षांचा असेल, तरीही त्याची जिद्द आणि फिटनेस पाहता तो मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे. रोहितच्या या स्पष्ट भूमिकेमुळे बीसीसीआय (BCCI) आगामी काळातील प्लॅनिंगमध्ये त्याला केंद्रस्थानी ठेवण्याची शक्यता आहे.
