साई सुदर्शन फक्त 17 धावा करून बाद झाला
साउथ आफ्रिका संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ एकमेकांसमोर आहेत. ऋषभ पंत भारतीय अ संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. दरम्यान, साई सुदर्शन पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने 52 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 17 धावा केल्या, त्यात फक्त तीन चौकार मारले. पण आता प्रश्न असा आहे की साई सुदर्शन सतत फ्लॉप ठरत असूनही BCCI त्याचवर एवढा फिदा का? देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याची वाईट अवस्था असूनही टीम इंडियामध्ये त्याला स्थान का? याच स्पष्ट उत्तर मिळाल नसलं तरी, हा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे.
advertisement
साई सुदर्शनची आतापर्यंतची कामगिरी
साई सुदर्शनने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तो वेस्ट इंडिज मालिकेत दिसला, परंतु तो प्रभावित करण्यात अपयशी ठरला. या पाच कसोटी सामन्यांमध्ये, साई सुदर्शनने नऊ डावांमध्ये फक्त 273 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी सुमारे 30 आहे आणि तो 45.42 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. आतापर्यंत, साईने फक्त दोन अर्धशतके केली आहेत.
दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका साईसाठी महत्त्वाची असेल
शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्यापासून, साई सुदर्शनला जवळजवळ सतत संधी मिळत आहेत, परंतु तो अपेक्षेनुसार फलंदाजी करू शकला नाही. आता, दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका साईसाठी महत्त्वाची असेल. जर तो या मालिकेतील चार डावांमध्येही कामगिरी करू शकला नाही, तर बीसीसीआय निवड समिती त्याच्याबद्दल नक्कीच काही विचार करेल. इतर अनेक खेळाडू त्यांच्या पाळीची वाट पाहत बाहेर बसले आहेत.
