Shali Hope Hit wicket : क्रिकेटमध्ये फलंदाज कसा आऊट होईल याचा काही नेम नाही,अशीच प्रचिती या सामन्यात आली आहे.कारण हा खेळाडू खूपच विचित्र पद्धतीने आऊट झाला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू अशा पद्धतीने आऊट होईल अशी कल्पना सुद्धा कुणी केली नव्हती. पण आता हा खेळाडू आऊट झाला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.त्यामुळे या व्हिडिओची क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.
advertisement
कॅरिबियन प्रीमियर लीगच्या ट्रिनबागो नाईटरायडर्स आणि गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यात रंगलेल्या 17 व्या सामन्यात शाई होप खूपच विचित्र पद्धतीने बाद झाला. वाईट जात असलेला बॉल मारायला गेलेला शाई होप हिट विकेट आऊट झाला.
डावाच्या 14 व्या षटकात, टेरेन्स हिंड्सच्या चेंडूवर स्विच हिट मारण्याचा प्रयत्न करताना शाई होपने आपली विकेट गमावली आहे. त्याचं झालं असं की बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता, त्यामुळे शाई होप एका विचित्र स्थितीत आला आणि त्याने बॉल थर्ड मॅनकडे मारण्याचा प्रयत्न केला. पण होपची बॅट स्टंपला लागली आणि तो वाइड बॉलवर हिट विकेट झाला. त्यामुळे अशा विचित्र पद्धतीने शाई होप बाद झाला. त्याने यावेळी 29 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली.या खेळीत त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला होता.
होप बाद झाल्यानंतर गयानाची धावसंख्या 14 ओव्हरमध्ये 7 बाद 109 झाली. ड्वेन प्रिटोरियस 16 बॉलमध्ये 21 धावा आणि क्वेंटिन सॅम्पसनने 19 बॉलमध्ये 25 धावा केल्या. यावेळी त्यांनी आठव्या विकेटसाठी 33 चेंडूत 48 धावांची भागीदारी करून त्यांच्या संघाला 9/163 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.
दुसऱ्या डावात, अॅलेक्स हेल्स आणि कॉलिन मुनरो यांनी ट्रिनबागो नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 63 बॉलमध्ये 116 धावा जोडल्या. हेल्सने 43 बॉलमध्ये तीन चौकार आणि सात षटकारांसह 74 धावांची शानदार खेळी केली. मुनरोने 30 बॉलमध्ये 52 धावा करत चांगली साथ दिली.
गयानाचा कर्णधार इम्रान ताहिरने आपल्या संघासाठी एकहाती लढा दिला आणि नाईट रायडर्सची फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने आपल्या तिसऱ्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. इम्रानने चार
ओव्हरमध्ये 27 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. नाईट रायडर्सचा स्कोअर 25 चेंडूत 116/0 वरून 137/4 वर गेला. तथापि, किरॉन पोलार्ड 12 धावा आणि आंद्रे रसेल 27 धावा केल्या आणि 17.2 षटकात त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला.