TRENDING:

शिवम दुबे भर मैदानात रिंकूवर भडकला, रन आऊट नव्हते कारण; 3 दिवसांपूर्वीचा राग बाहेर पडला, हायव्होल्टेज सामन्यात झाला ड्रामा

Last Updated:

Shivam Dube Run Out: T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात धाव घेण्याच्या गोंधळामुळे शिवम दुबे सलग दुसऱ्यांदा रनआऊट झाला. रिंकू सिंगसोबत झालेल्या गैरसमजामुळे अखेरच्या षटकात मोठा राडा पाहायला मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो: T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत टीम इंडियाच्या डावात एक मोठा राडा झाला. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला पहिला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. टीम इंडियाकडून ईशान किशनने धमाकेदार सुरूवात करून दिली. त्यानंतर कर्णधार सूर्याने महत्त्वाचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंग मैदानात होते. हे दोघे शेवटपर्यंत मैदानात राहतील असे वाटत होते. पण अखेरच्या ओव्हरमध्ये एक मोठी चूक झाली.
News18
News18
advertisement

भारताचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे २०व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रनआऊट झाला. या स्पर्धेत रनआऊट होण्याची ही त्याची सलग दुसरी वेळ आहे. इतक नाही तर दोन्ही वेळा तो रनआऊट होण्यासाठी कारण ठरला तो रिंकू सिंग होय. पाकिस्तानविरुद्ध बाद झाल्यानंतर शिवमला राग अनावर झाला आणि त्याने भर मैदानात रिंकूला जाब विचारला.

अखेरच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर दुसरी धाव घेताना रिंकू आणि त्याच्यात धाव घेण्यावरुन गोंधळ उडाला आणि त्यात दुबे रनआऊट झाला. याआधी नामीबियाविरुद्ध देखील तो असाच बाद झाला होता.

advertisement

नामीबियाविरुद्धची काय झालं होतं

नामीबियाचा गोलंदाज गेरहार्ड एरास्मसने टाकलेल्या चेंडूवर रिंकू सिंगने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कट मारला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड झाल्याने एक धाव सहज मिळू शकत होती. मात्र रिंकूने सुरुवातीला सिंगल नाकारली. तोपर्यंत शिवम दुबे अर्ध्या पिचपर्यंत पुढे आला होता. मागे फिरण्यासाठी उशीर झाल्याने त्याला धावचीत व्हावे लागले. बाद झाला तेव्ह दुबेने 16 चेंडूत 23 धावा केल्या होत्या (1 चौकार, 1 षटकार). त्या वेळीही रिंकूच्या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

advertisement

पाकिस्तानविरुद्ध पुन्हा तोच प्रकार

आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा गोंधळ झाला. रिंकू सिंगने शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू कव्हरच्या वरून फटका मारला. स्वीपरने चेंडू रोखला. पहिली धाव पूर्ण झाल्यानंतर दुबेला दुसरी धाव शक्य असल्याचे वाटले आणि तो जोरात पळाला. मात्र रिंकूने दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. दुबेला परत फिरावे लागले आणि मोहम्मद नवाझने अचूक थ्रो करत त्याला बाद केले. दुबेने 17 चेंडूत 27 धावा केल्या होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

या घटनेनंतर दुबे स्पष्टपणे नाराज दिसला. तो रिंकूकडे पाहत काहीतरी बोलताना दिसला. क्षणभर त्याच्या हॅमस्ट्रिंगला ताण आला का अशी शंका निर्माण झाली, मात्र तो नंतर व्यवस्थित चालत मैदानाबाहेर गेला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शिवम दुबे भर मैदानात रिंकूवर भडकला, रन आऊट नव्हते कारण; 3 दिवसांपूर्वीचा राग बाहेर पडला, हायव्होल्टेज सामन्यात झाला ड्रामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल